Naxal Attack in Bijapur : हरवलेल्या सैनिकाच्या मुलीने केली विनंती; म्हणाली – ‘नक्षल काका, प्लिज…माझ्या वडिलांना सोडा’ (व्हिडीओ)

सुकमा : छत्तीसगड जिल्हातील विजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान झालेल्या चकमकीनंतर रविवारी २२ सैनिक शहीद झाले. यापैकी २१ सैनिकाचे मृत शरीर सुरक्षा दलाने चकमकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या मदतीने उचलले. CRPF च्या कोब्रा बटालियनचे सैनिक राकेश्वरसिंग मनहास बेपत्ता झाले आहेत. सोमवारी नक्षलवाद्यांनी बेपत्ता सैनिक त्यांच्या ताब्यात असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांना दिली. त्याचबरोबर त्यांनी जवानांना नुकसान न करण्याची गोष्ट केली. सूत्रांच्या माहितीनुसार, सैनिकाला चकमकीच्या जागेपासून जवळ एका गावात ठेवण्यात आले आहे. येथे आजूबाजूला नक्षलवाद्यांची उपस्थिती आहे.

दरम्यान, सैनिकांची पाच वर्षाची मुलगी राघवी हिने नक्षलवाद्यांना वडिलांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणाली, ”पापांच्या परीने पप्पाना खूप मिस केले आहे. मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते. प्लिज नक्षल काका, माझ्या वडिलांना घरी पाठवा.” त्यानंतर राघवी आणि तेथे उपस्थित सर्व लोकांचे अश्रू अनावर झाले. या जवानांची पत्नी मिनू यांनी नक्षलवाद्यांकडे आपल्या पतीला सोडण्याची विनंती केली. CRPF च्या कोब्रा बटालियनचे सैनिक राकेश्वरसिंग मनहास कोथियन जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत. त्यांची पोस्टिंग विजापूर जिल्ह्यात झाली आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात ऑपरेशनमध्ये ते सामील होते. चकमकीनंतर त्यांना बेपत्ता सांगितले जात आहे.

 

 

सोमवारी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्यात काही पत्रकारांना फोन करून सांगितले की बेपत्ता सैनिक त्यांच्या ताब्यात आहे. ते म्हणाले की सैनिक पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांना लवकरच सोडले जाईल. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना आवाहन ही केले आहे की ऑपरेशन प्रहारमध्ये सहभागी होऊ नये. या माहितीनंतर, गुप्तचर आणि पोलीस प्रशासन सतर्क झाले असून जवानाला सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

गावामध्ये दिसला सैनिक
सूत्रांच्या माहितीनुसार, गोळीबारात राकेश्वरसिंग मनहासने गोळ्या झाडल्या आणि ते स्वतःचा बचाव करण्यासाठी डोंगराजवळ लपले. जेव्हा गोळीबार थांबला, तेव्हा ते रायफलसह आपला मार्ग चुकून एका गावी गेले. गावच्या आधी ग्रामीण वेषभूषेमध्ये नक्षलवादी संघटनांच्या सदस्यांनी जवानाला थांबविले आणि त्यांची बंदूक काढून घेतली. त्यांतर सैनिकाला नक्षलवाद्यांकडे सोपविण्यात आले. त्यातच ही माहिती मिळाली आहे की सैनिक बेशुद्ध अवस्थेत डोंगराजवळ मिळाला, त्यांना ग्रामीण लोकांनी नक्षलवाद्यांकडे पोहचवले.

आई काळजीत तर पत्नीने केली विंनती
सैनिक राकेश्वरसिंग मनहास यांच्या अपहरणाची बातमी मिळताच, जम्मूमध्ये त्यांची आई कुंती काळजीत पडल्या. तर जम्मूमध्ये राहत असलेली त्यांची पत्नी मिनू यांनी पत्रकारांच्या माध्यमातून नक्षलवाद्यांना विनंती केली आहे की त्यांच्या पतीला सुरक्षित सोडा. सरकारनेही विनंती केली आहे की त्यांच्या पतीला सोडावे. त्यांची एक चार वर्षांची मुलगी आहे.

विजापूर चकमकीत २१ सैनिक बेपत्ता
सुकमा येथील नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकी दरम्यान २१ जवान बेपत्ता झाले होते, त्यापैकी २० जणांचे मृतदेह रविवारी हवाई दलाच्या मदतीने सापडले आहेत, तर एक जवान राकेश्वरसिंग यांचा शोध अजूनही बाकी आहे. हे सांगणे कठीण आहे की नक्षलवाद्यनाचा दावा किती खरा आहे. जर हे सत्य असेल तर शक्यता आहे की चकमकीनंतर जखमी सैनिकाला त्यांच्यासोबत घेऊन गेले.

विजापूर नक्षलवादी हल्ल्यानंतर नक्षल प्रभावित क्षेत्रात अलर्ट
विजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या मोठ्या घटनांमध्ये संपूर्ण राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खुफिया इंपुटच्या आधारे स्पेशल इंटेलिजेंत ब्युरो (SIB) बस्तर विभागातील सर्व जिल्हे तसेच महाराष्ट्र, झारखंड आणि ओडिशाच्या सीमांना लागून असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शोध वाढवून अतिरिक्त दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.