महापालिका निवडणुकीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त- सुहेल  शर्मा

सांगलीः पोलीसनामा आॅनलाईन-

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोम्बींग, ऑल आऊट ऑपरेशन सुरू आहे. त्याशिवाय मतदानादिवशी तसेच निकालादिवशी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आतापर्य्ंत एकही अनुचित प्रकार घडला नसून पोलिसांचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी 164 संवेदनशील केंद्रांवरही अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
[amazon_link asins=’B00RBGYG74′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89924637-9186-11e8-8ac3-8589fd57f881′]

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 122 जणांवर महापालिका क्षेत्रात प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत आचारसंहिता भंगाचे नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. आतपर्यंतची प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. आचारसंहिता काळात वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल चालू ठेवल्याप्रकरणी 176 हॉटेलना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर नाकाबंदी दरम्यान दारू पिऊन वाहन चालवणार्‍या 735 जणांवर कारवाई करण्यात आल्याचेही शर्मा यांनी यावेळी सांगितले.

निवडणुकीच्या काळात पैसे, दारू तस्करीसह गुन्हेगारी कारवायांवर पोलिसांचा वॉच ठेवण्यात आला आहे. कोम्बींग, ऑल आऊट ऑपरेशनसह नाकाबंदी सुरूच राहणार आहे. रात्री अकरा ते पहाटे पाच यावेळेत महापालिका क्षेत्रातील बारा ठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. निकाल लागेपर्यंत ती सुरूच राहणार आहे. त्याशिवाय मतदानादिवशी तसेच मतमोजणीनंतर दंगा होणारी ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून नोंद केली आहेत.
[amazon_link asins=’B01LXHKR4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f6d9a34-9186-11e8-91cc-2bf4078c7cb0′]

अशा हॉटस्पॉटवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. त्याशिवाय वाद होणारी ठिकाणे अति संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तेथेही बंदोबस्त नेमण्यात आल्याचे अधीक्षक शर्मा यांनी यावेळी सांगितले.

पहा असा असणार निवडणूक काळात पोलीस बंदोबस्तः

 पोलिस उपअधीक्षक : 6
निरीक्षक          : 13
सहाय्यक, उपनिरीक्षक : 52
कर्मचारी            : 1,072
होमगार्ड            :  600
दंगल नियंत्रण पथक : 1