तब्बल 1800 कोटींची लॉटरी जिंकली पण तिकिटच केलं नाही खरेदी; वाचा काय आहे प्रकार

लंडन : वृत्तसंस्था –  इंग्लंडमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचे आयुष्य पूर्णपणे पलटणार होते. पण एका छोट्याशा चुकीमुळे तिचे मोठे नुकसान झाले. या विद्यार्थिनीने 182 मिलियन पाऊंड्स म्हणजेच सुमारे 1800 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला होता. मात्र, तिच्यासोबत जे काही झालं त्यामुळे तिला मोठे नुकसान झाले. तिला 1800 कोटींची लॉटरी लागली पण तिने ती लॉटरीच खरेदी केली नव्हती.

रेचल केनेडी असे या तरुणीचे नाव आहे. ती ब्रायटन युनिव्हर्सिटीत अंडर ग्रॅज्युएटचे शिक्षण घेत आहे. या आठवड्यात तिच्या नंबरवर जॅकपॉट लागला होता. त्यानंतर तिला खूपच आनंद झाला. मात्र, तिचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण तिने त्या आठवड्यात तिकीट खरेदीच केले नव्हते. याबाबत रेचलने सांगितले, की ती युनिर्व्हसिटीच्या कामामुळे अत्यंत व्यस्त होती आणि त्यामुळेच तिला विकली लॉटरी खरेदी करण्याचा विचार आला नाही. रेचलच्या बॉयफ्रेंड लियामने ट्विटरवरून माहिती दिली. त्यात तो म्हणाला, जेव्हा रेचलने युरो मिलियन न खेळण्याचा निर्णय घेतला होता. नेमकं त्याचवेळी तिच्या लॉटरीचे आकडे त्यावर दिसले. पण तिकिट नसल्याने तिला ही रक्कम मिळू शकली नाही.

लियामने या ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला. या फोटोमध्ये रेचलच्या तिकिटासोबत दिसत आहे. तिने गेल्या गेल्या आठवड्यात तिकिट खरेदी केले होते. त्यावरही लॉटरीचे नंबरचे छापले होते.

दरम्यान, फ्रायडे युरोमिलियन्स जॅकपॉट स्वित्झर्लंडच्या एका व्यक्तीला मिळाला आहे. रेचलने लॅड बायबलसह केलेल्या संवादात सांगितले, की मला वाटते जगभरात कोणतीही गोष्ट होत असते तर त्यामागे कोणते ना कोणते कारण असते. मी आशा करतो, की लॉटरी ज्याने कोणीही जिंकली त्याला या पैशांची गरज असेल.