Corona Virus : वाटलं नरकात पोहचलो, ‘कोरोना’ व्हायरसनं पिडीत असलेल्यानं सांगितला ‘भयानक’ अनुभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये वुहान शहरात कोरोना व्हायरसने 1,500 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. जगभरातील 68,000 पेक्षा जास्त लोक या व्हायरसचे शिकार झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या विळख्यातून बचावलेला एक 21 वर्षीय विद्यार्थी टायगर म्हणाला की त्याचे जीवन नरक बनले होते.

टायगर म्हणाला की, व्हायरसच्या संसर्गापासून उपचार सुरु असताना पर्यंतचा त्याचा काळ एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा वेगळा नव्हता. 21 जानेवारी जेव्हा अचानक टायगरची प्रकृती बिघडली तेव्हा त्याला खूप ताप होता.

त्यानंतर जेव्हा तो वुहानमधील एका मोठ्या रुग्णालयात गेला तेव्हा तेथे वेटिंग रुममध्ये पहिल्यापासूनच अनेक रुग्ण वाट पाहत असल्याचे त्याने पाहिले. तेव्हाच त्याला कळाले की त्याला बराच काळ वाट पहावी लागणार आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला हे सांगून परत पाठवले की त्याला कोरोना व्हायरसची लक्षण नाहीत. त्यानंतर टायगर एका जवळच्या रुग्णालयात गेला आणि औषधं घेऊन परत आला.

त्यानंतर त्याने पूर्ण तपासणी करुन घेतली, तो याबाबत नशीबवान ठरला की त्याचे वडील हेल्थ केअर वर्कर आहेत आणि या घातक आजारापासून कसे वाचावे यासाठी त्याचे वडील जागरुकता निर्माण करण्याचे काम करत होते. टायगर म्हणाला की चार दिवस त्याची प्रकृती बिघडली होती. तापामुळे त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते. त्याची तब्येत बिघडत चालली होती. खोकला आल्यावर त्याला वाटायचे की त्याची जीवन आता इथंच संपणार.

त्यानंतर तो पुन्हा तपासणीसाठी पोहोचला तेव्हा डॉक्टरांना शंका आली की तो कोरोना व्हायरसने ग्रस्त आहे. त्यानंतर त्याला न्यूक्लिक अ‍ॅसिड टेस्ट करायची होती. या टेस्टनंतर हे निश्चित झाले की त्याला कोरोना झाला आहे. परंतु उपचारासाठी आवश्यक असलेले कीट महाग असल्याने डॉक्टरांनी त्याची केस गंभीर्याने न घेता त्याला घरी पाठवले. तो जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याला त्यांच्या भावामध्ये आणि आजीमध्ये तिचं लक्षणं दिसत होती. टायगर म्हणाला की मला मृत्यू समोर दिसत होता. मला वाटत होते की मी नरकाच्या दरवाजात आहे.

टायगर म्हणाला की, मी पुन्हा रुग्णालयात गेलो आणि तपासणी केली. माझा ताप 102 डिग्री पार झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी मला आयवी ट्रिटमेंट दिली आणि कलेट्रा नावाची एक कॉम्बिनेशन ड्रग दिली जी एचआयव्ही पीडित रुग्णाला दिली जाते. त्यानंतर माझा ताप कमी झाला. योग्य उपचार झाल्याने टायगर या जीवघेणा आजारातून बचावला. डॉक्टरांनी त्याला 5 दिवस एंट्री वायरल ड्रग एलुवाया दिली आणि त्याला घरी पाठवले, कारण रुग्णालयात बेड रिक्त नव्हता.