मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. टर्मिनल च्या छतावरून एका अज्ञाताने उडली घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं मुंबई विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 च्या पार्किंगच्या बिल्डींगवरून एकाने उडी घेतली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु त्याची परिस्थिती गंभीर असल्याचं समजत आहे. या व्य्क्तीने पार्किंगच्या बिल्डींगवरुन उडी घेतल्यानंतर तेथील सेक्युरिटी गार्ड्सने तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी पोलिसांना वॉलेट आणि मोबाईल मिळाला आहे असे असले तरी अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलिसांचा या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. सध्या त्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. तो व्यक्ती कोण आहे हे मात्र अद्याप समजलेलं नाही. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/