अभिनेता ईशान खट्टर करणार वयानं दुप्पट असलेल्या तब्बू सोबत ‘रोमँस’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता ईशान खट्टर आणि तब्बू स्टारर वेब सीरीज ए सुटेबल बॉयचा ( A Suitable Boy) फर्स्ट लुक समोर आला आहे. ईशाननं स्वत: इंस्टाग्रामवरून हा लुक शेअर केला आहे. ईशाननं या दुप्पट वयानं मोठ्या असणाऱ्या तब्बू सोबत काम केलं आहे. एका फोटोत दोघं रोमँस करताना दिसत आहेत. एका झोपाळ्यावर दोघं रोमँटीक पोजमध्ये दिसत आहेत.

ईशान आणि तब्बूचा हा रोमँटीक पोजमधील फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. ईशाननं हा फोटो शेअर केल्यानंतर आयुष्मान खुराना, करण जोहर आणि मीरा राजपूत यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A Suitable Boy.. first look

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on

मीरा नायरचा प्रोजेक्ट असणारी ही वेब सीरीज चांगली स्टोरी घेऊन येत आहे. कारण ईशानचं वय 24 वर्षे आहेत तब्बू 48 म्हणजेच दुप्पट वयाची आहे. त्यामुळे पोस्टर पाहून स्टोरीविषयी उत्सुकता अधिकच वाढत आहे. या सीरीजमध्ये ईशान मान कपूरची भूमिका साकारत आहे जो राजकीय नेता महेश कपूर सोबत आपल्या प्रेमासाठी बंडखोरी करतो. जिच्यासाठी तो हे करतो ती वेश्या असते. सईदा बाई असं तिचं नाव आहे. ही भूमिका तब्बू साकारत आहे. ईशानच्या वडिलांच्या भूमिकेत राम कपूर दिसणार आहे.

विक्रम सेठची ए सुटेबल बॉय ही कादंबरी खूप गाजली. या कादंबरीचा मोठ्या प्रमाणावर खप झाला. याच कादंबरीवर आधारीत ही सीरीज असणार आहे. याचे एकूण 6 पार्ट असणार आहेत. या सीरीज मध्ये रसिका दुग्गल, नमिता दास, दिनेश रिझ्वी आणि माहिरा कक्कर मुख्य भूमिकेत असणार आहेत. यात नसीरुद्दीन शहांचा मुलगा विवान शहादेखील दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like