चोरी केल्याचा पश्चाताप अन् ‘त्याने’ केली गळफास घेऊन आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – चोरीच्या पश्चातापामुळे एका संशयित अल्पवयीन मुलाने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सांगली मध्ये घडली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन शुभम व्हनखंडे (वय १७) या मुलाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या पूर्वी चोरीची कबुली आणि चूक झाल्याची चिट्ठी लिहून शुभम याने आत्महत्या केली आहे.

शुभम व्हनखंडे या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने चोरीच्या पश्चातापातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुभम हा सांगलीच्या राममंदिर चौकातील एका बेकरी मध्ये कामाला होता. त्याच बेकरीमध्ये त्याने आपल्या मित्रांसोबत १ नोव्हेंबर रोजी चोरी केली होती. या प्रकरणी सांगली शहर पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तपासा दरम्यान पोलिसांनी गुरुवारी शुभम व त्याच्या मित्रास ताब्यात घेऊन चौकशी केली होती.

यानंतर शुभम याला पोलिसांनी पुढील चौकशीसाठी गुरुवारी येण्यास सांगून सोडून दिले होते. मात्र शुभम याने आपले घर गाठत आपल्या दुकान मालकास फोनवरून आपली चूक झाली, माफ करा असे सांगत घरी कोणी नसताना बुधवारी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्यापूर्वी शुभम याने एक चिट्ठी लिहली असून ज्यामध्ये शुभमने आपल्याला पैश्याची गरज होती आणि त्यामुळे आपण दुकानात चोरी केल्याची कबुली देत, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, असा मजकूर लिहला आहे. घटनास्थळी ही चिट्ठी पोलिसांना सापडली आहे. चोरीच्या पश्चातापामुळे शुभम याने ही आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us