Pune : नामांकित कंपनीतील टीमलीडरनं केले 22 वर्षीय सहकारी तरूणीवर अश्लील कमेंट, छेडछाड करत केला विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नामांकित कंपनीच्या टीमलीडरनेच सहकारी तरुणीला अश्लील कमेंट करून तिची छेडछाड करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीला सतत त्रास दिल्यानंतर तिने कंपनीतील वरिष्ठांकडे तक्रार केली. पण त्यावर काहीच झाले नाही. यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार टीमलीडर संजय दास आणि कंपनीची इतर अधिकाऱ्यांवर विनयभंग यासह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी येथील कंपनीत नोकरीस आहे. दास तरुणी काम करत असलेल्या ग्रुपचा टीम लीडर आहे. त्यावेळी तो सतत त्रास देत असे. तरुणीला स्पर्श करणे, अश्लील कमेंट करणे आणि ती वॉशरुमाल जात असताना तिच्या पाठीमागे जात असे. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण त्यांनी दासवर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्याचे आणखीनच धाडस वाढले. त्यानंतर तरुणीने या त्रासाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.