रेल्वेत प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारणारा सराईत गजाआड

मिरज : पोलीसनामा आॅनलाइन – रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल तसेच किमती वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलीसांनी अटक केली आहे. सुनिल गणपती जाधव (वय 35, रा. घुणकी, ता. हातकणंगले) असे चोरट्याचे नाव आहे. तो मिरज, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकात चोरी करत असे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’934ffe1d-cfc5-11e8-a4a5-cbe7fccbe4a3′]

सुनिल जाधव याला यापूर्वीही 2004 साली मिरज रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी प्रकरणी पकडण्यात आले होते. त्या प्रकरणी शिक्षाही ठोठावण्यात आली. त्यानंतर त्याने दौंड व कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारला होता. या दोन्ही स्थानकातील मोबाईल चोरी संदर्भात त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. सुनिल जाधव याची पंधरा दिवसापूर्वीच कारागृहातून सुटला झाली होती.

चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून सुरुखप बाहेर काढले
बावधनमध्ये एकाच रात्रीत नऊ घरे फोडली 

कारागृहातून सुटून आल्यानंतर त्याने पून्हा दि. 12 रोजी सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या पुलवर्ती देसराजू (वय 29, रा. बेंगलोर) यांचा मोबाईल मिरज स्थानकात चोरला होता. यावेळी स्थानकात बंदोबस्तावरील रेल्वे पोलिसांनी सुनिल जाधव यास अटक केली आहे. या प्रकरणी हवालदार राजाराम पाटील अधिक तपास करीत आहेत.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8ce4f34-cfc5-11e8-9a95-4335698badae’]

दरम्यान, शनिवारी रात्री कोल्हापूर-मिरज पॅसेंजरमध्ये प्रवास करत असताना किरण विश्‍वनाथ चव्हाण (वय 22, रा. परभणी) हे गाडीत  झोपलेले होते. त्यांच्या खिशातील रोख 1 हजार 800 रुपये व 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. तसेच सातारा-कोल्हापूर डेमू लोकलमध्ये गर्दीचा फायदा घेवून महिला डब्यामध्ये दोन महिलांकडूनही मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.