जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न फसला, सहा AK – 47 रायफलीसह 3 दहशतवाद्यांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन – काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर काही दिवस शांतात टिकवण्यासाठी तेथील परिसरात काही बंधने घालण्यात आली होती मात्र हळूहळू परिस्थती पहिल्यासारखी सुरळीत झाली. मात्र सुरक्षेच्या टृष्टीने काश्मिरातील लष्कर सदैव अलर्ट ठेवण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी एक मोठा दहशतवादी कट उधळवून लावला आहे. कठुआ येथून शस्त्रे घेऊन जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी पकडले आहे. यात पोलिसांना 6 एके – 47 रायफल मिळाल्या आहेत.

जम्मू-काश्मीरच्या एसएसपी यांनी सांगितले की तीन संशयित दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी पंजाब-जम्मू-काश्मीर सीमेवर असलेल्या लखनपूर येथून ट्रक पकडला आहे.

हत्यारे घेऊन जाणाऱ्या या ट्रकमुळे आतंकवाद्यांचा काश्मिरात काही घात पात करण्याचा प्रयत्न तर नव्हता ना ? याचा अद्याप भारतीय लष्कर तपास करत आहे. काश्मिरचा विशेष दर्जा काढल्यानंतर तेथील सैन्य दल हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने हत्यारे घेऊन जाणारा ट्रक पकडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

Loading...
You might also like