वीस लाखाचे बीफ मटण भरलेला ट्रकच पळवला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली येथून बीफ मटण घेऊन मुबंईला निघालेला ट्रक अडवून, चालकास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि ट्रक चौघांनी पळवून नेला. हा प्रकार मंगळवारी पहाटे साडे चारच्या सुमारास पुणे-मुंबई बायपास हायवेला पुनावळे येथे घडला.

[amazon_link asins=’B078J1XCPW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87493ae8-8a45-11e8-b130-a5bf6d074918′]

याप्रकरणी इम्रान अली अहमद खान (२३, रा. मुंबई, मूळ- उत्तरप्रदेश) याने फिर्याद दिली आहे. तर एक्सीओ मोटारीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खान हा मुंबई येथून सांगलीला साहित्य ट्रक घेऊन गेला होता. परत येत असताना सांगलीतुन ट्रक मध्ये सुमारे २० लाख रुपयांचे बीफ मटण भरून मुंबईला निघाला होता. दरम्यान वाकड, पुनावळे येथे आल्यानंतर पाठीमागून एक्सीओ मोटारीतून आलेल्या चौघांनी त्याला अडवले. मारहाण करून ताच्याकडील रोख रक्कम काढून घेतली. तसेच त्याला खाली ढकलून बीफ मटण असलेला ट्रक असा एकूण ४० लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तपास वाकड पोलीस करत आहेत.

You might also like