मोहाडी उपनगरात काचेच्या बाटल्यांनी भरलेल्या ट्रकला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील मोहाडीतील शिवानंद कॉलनीचे चडतीवर सोनल विलास वेडे यांच्या मालकीच्या अशोक लेलॅंड (गाडी क्रमांक Mh १८, BG ४४८९) या गाडीला मध्यरात्री दीड वजेच्या सुमारास अचानक आग लागली.

घरात आसलेल्या वेडे यांना काचेच्य बाटल्यांचा फुटण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी दरवाजा उगडून आग विजवण्याचा प्रयत्न केला. तसेच नंतर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंत अग्नीशमन जवानांच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली.

सदर गाडी मालक यांनी गुजरातवरून रात्री १२ वाजता काचेच्या बाटल्या घेऊन मोहाडी येथील निवासस्थानी जेवण करण्यासाठी गाडी थांबवली होती. त्यादरम्यान रात्री दिडच्या सुमारास अचानाक गाडीला आग लागली. दरम्यान रात्री अडीजच्या सुमारास हैदराबाद याठीकाणी गाडी मालक माल घेऊन जाणार होते. परंतु, या आगीत गाडीतील अडीच ते तीन लाख रुपयेचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us