रेल्वे स्थानकासमोर दुचाकीस्वारांनी एकाला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बडोदऱ्याहून पुण्यात आल्यानंतर विश्रांतीसाठी लॉज शोधत असलेल्या व्यक्तीला अडवून दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी त्याच्या खिशातील ३ हजार ९०० रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना पुणे रेल्वे स्थानकासमोर मंगळवारी रात्री घडली.

याप्रकरणी नरेश सुभाषचंद्र शाह ( ४६, बडोदरा, गुजरात) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीवरून आलेल्या दोघांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह हे गुजरातहून मंगळवारी रात्री पुण्यात आले होते. ते पुण्यात विश्रांतीसाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास लॉज शोधत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्या खिशातील ३ हजार ९०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून तेथून पसार झाले. या प्रकारानंतर शाह यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे करत आहेत.

Loading...
You might also like