दौंड शहरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, अग्निशमन बंब, एस.टी बस फोडली

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात शांतता मार्गाने सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन दौंड शहरात मात्र आज हिंसक बनले. २६ जुलै रोजी शांतता मार्गाने निघालेल्या मराठा मोर्चातील काही युवकांनी हिंसक होत दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला यावेळी या युवकांनी दगडफेक केल्याने दुकानदार गंभीर जखमी झाले आहेत.
[amazon_link asins=’B01LXHKR4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’daf5f193-90bd-11e8-ac75-ffcbe986af2c’]

आज गुरुवारी दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील युवकांनी रास्ता – रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली.
सकाळी सव्वा अकरा वाजता रेल्वे उड्डाण पूल येथे पाटस – दौंड – बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे दौंड-बारामती, दौंड-नगर व दौंड-पाटस रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. दौंड शहराजवळच्या सोनवडी, गार , गिरीम, बेटवाडी येथील मोर्चेकरी युवकांनी घोषणाबाजी करीत व्यापारपेठ बंद पाडली. बंद ची कुठलीही पूर्व सूचना नसल्याने सर्व दुकाने व व्यवहार सुरू होते. अचानक बंदची हाक देण्यात  आल्याने अनेक दुकांदारांना दुकाने बंद करता आली नाही त्यामुळे काही युवकांनी उघड्या दुकानांवर दगडफेक केली. दुचाकी वाहनांवर हातात झेंडे व दगडे घेऊन फिरणार्या जमावामुळे बाजारपेठेत आलेले सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी व व्यापारी यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.

दौंड – नगर महामार्गावरील नानवीज फाटा येथे आंदोलकांनी टायर पेटवून दिले असल्याची माहिती दौंड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला मिळाल्याने आग विझविण्यासाठी गेलेल्या या बंबाला लक्ष करण्यात येऊन त्याच्या काचा फोडण्यात आल्या यावेळी दौंड-श्रीगोंदे या एसटी बसच्याही काचा फोडण्यात आल्या.
[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1671d4f-90bd-11e8-bcc6-7d2d8a3f85db’]

शांततेत सुरू झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करीत मुख्य बाजारपेठेसह दौंड – गोपाळवाडी रस्त्यावरील दुकाने बंद पाडली.
दुचाकीवर दहशत माजउन फिरणाऱ्या शहरातील एका जमावाने अपार्टमेंट मधील एका दुकानदाराच्या तोंडावर दगड मारून त्यास गंभीररित्या जखमी केले.

आजच्या दौंड शहरातील मोर्चात दौंड बाहेरील  गावांमधील बहुसंख्य  युवक सहभागी झाले होते त्यांच्याकडून हे प्रकार करण्यात आल्याची चर्चा दौंड शहरात सुरू होती. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दगडफेकीनंतर पोलिस बंदोबस्तात वाढ केली असुन शहरात तणावपूर्ण शांतता आहे