अल बगदादीच्या मृत्यूची खोटी ‘स्टोरी’ सांगुन गेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील महिन्यात चर्चा झाली ती दहशतवादी आणि इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबु बकर अल बगदादीच्या मृत्यूची. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्विट करत सांगितले की आज काही तरी मोठं घडलंय. परंतू ट्रम्प यांच्या या दाव्यावर तेथील मिडियाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.

काय दावा होता ट्रम्प यांचा
26 ऑक्टोबरला रात्री अमेरिकी सैन्याने बगदादीचा खात्मा केला. ट्रम्प या कारवाईला पाहत होते. त्यानंतर ट्रम्प यांनी सांगितले की बगदादी मारला गेला. या कारवाई माहिती देत ते म्हणाले की आपल्या मृत्यूच्या आधी बगदादी रडत होता. त्यांनी हे देखील सांगितले की ज्या वेळी बगदादीने स्वत:ला उडवले त्यावेळी त्याची तीन मुलं देखील उपस्थित होती.

काय होतं व्हिडिओमध्ये
अमेरिकी सैन्याने दोन दिवसापूर्वी कारवाईचा व्हिडिओ फोटो शेअर केले. व्हिडिओमध्ये दिसते की अमेरिकेच्या स्पेशल फोर्सने नियोजनबध पद्धतीने बगदादी असलेल्या भागात हल्ला केला. ही कारवाई जवळपास 2 तास सुरु होती. परंतू बगदादीच्या ओरडण्याची कोणतीही माहिती यात नाही.

ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
न्युयॉर्क टाइम्सच्या मते, अमेरिकी सैन्याच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले की कारवाईची संपूर्ण माहिती शेअर करण्याची परवानगी नाही. परंतू त्यांनी सांगितले की ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. एक अमेरिकी अधिकाऱ्यांने सांगितले की ट्रम्प यांनी स्वत:ची प्रशंसा करुन घेण्यासाठी हा दावा केला. ते म्हणाले की ट्रम्प ज्या कारवाईचा व्हिडिओ पाहत होते त्यात कोणताही ऑडिओ नव्हता. व्हाईट हाऊसने देखील यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

ट्रम्प यांना खोटे बोलण्याची सवय
या दरम्यान जॉर्ज बुश यांच्या सल्लागाराने सांगितले की, ट्रम्प कायमच खोटे बोलत असतात, त्यांना खोटे बोलण्याची सवय लागली आहे. अध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प यांनी 13,000 खोटी विधान केली आहेत. या दरम्यान रॉयटर्सने एक पोल केला होता, त्या 19 टक्के लोकांना वाटते की ट्रम्प कायमच खोटे बोलत असतात. तर 40 टक्के लोकांना वाटते की ते कधीतरी खरे बोलतात. तर 41 टक्के लोकांनी सांगितले की ते कधीही खरे बोलत नाहीत. अमेरिकीन मिडियाच्या मते अध्यक्ष निवडणूक जवळ आल्याने ट्रम्प आपली प्रशंसा करुन घेण्यासाठी अशी विधाने करत आहेत.

Visit : Policenama.com