खळबळजनक ! ‘सेक्स’ रॅकेटमधील युवती ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 2 पोलिस अधिकार्‍यांसह 12 कॉन्स्टेबल क्वारंटाईन

उदयपूर : वृत्तसंस्था –   देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. त्याच बरोबर गुन्ह्यांचा तपास देखील पोलीस करत आहेत. पोलिसांनी ताब्यात असलेल्या देहविक्री करणाऱ्या तरुणीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांसह तब्बल 1 डझन पोलीस कॉन्स्टेबल कॉरंटाइन करण्यात आलं आहे.

राजस्थानमधील उदयपूर पोलिसांनी तीन महिला पोलीस उपायुक्तांनी दोन दिवसांपूर्वी पीटा अंतर्गत धडक कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी 10 तरुणांसह देहविक्री करणाऱ्या सात तरुणींना अटक केली होती. सात पैकी एका तरुणाची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. कारण ही कारवाई दोन पोलिसांच्या पथकांनी संयुक्तरित्या केली होती.

1 जुलै रोजी रात्री सुखेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल रामलखनवर पोलीस अधीक्षक चेतना भाटी यांच्या नेतृत्त्वात पोलिसांच्या एक पथकानं छापा टाकला होता. देहविक्री करणाऱ्या चार तरुणींसह सात तरुणींना पोलिसांना अटक केलं होतं. या सर्व तरुणींना पोलीस रिमांडमध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळी सर्व तरुणींची कोरोना चाचणी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस लाईनमधील चार महिला कॉन्स्टेबलला तैनात करण्यात आलं होतं.

दरम्यान, एका तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक मेवाडा यांनी सांगितले की, पोलीस उपायुक्त चेतना भाटी यांच्या नेतृत्त्वात सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच बरोबर सुखेर आणि घंटाघर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. आतापर्यंत एक पोलीस उप अधीक्षक, दोन एसएचओ आणि 11 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वरंटाईन करण्यात आलं आहे.

दरम्यान, या तरुणीला जामीन मिळाला असून तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ती दिल्लीची रहिवासी आहे. सध्या पोलीस तिचा शोध घेत आहेत. दुसरीकडे संबंधित तरुणी उदयपूरच्या बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तिचा मोबाईल लोकेशन ट्रेस करत आहे.