तिच्या ‘त्या’ त्रासामुळे त्याने केली आत्महत्या

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात पुरुषांकडून होणाऱ्या लैगिंक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडणारी मी टू ही मोहीम सुरु आहे. त्यात अनेक नामवंत कलावंत, राजकारणी यांनी भूतकाळात केलेल्या काळ्या कृत्याची प्रकरणे बाहेर येत असताना परभणीत मात्र एका महिलेच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही महिला त्यांच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करीत असत. ती त्याला पूर्ण करणे शक्य नसल्याने त्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb0ebab5-d042-11e8-a90d-51290b2951d7′]

परभणीतील करुणा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेतली. खोलीमध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम पोलिसांनी त्याचा मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर खोलीत पाहणी केल्यावर त्यांना एक चिठ्ठी आढळून आली. या तरुणाने आत्महत्येपूर्वी ही चिठ्ठी लिहिली होती.

[amazon_link asins=’B07BLYPJB6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f30b1a30-d042-11e8-857d-f98b8827ccfe’]

या चिठ्ठीत त्याने एका महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. संबंधित महिला वारंवार आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने त्या त्रासाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

पिंपरी/देहूरोड : तळवडेत दगडाने ठेचून तरुणाचा खून