रशिया : विमानामध्ये कपडे काढून नग्न होण्याचा प्रयत्न करीत होती महिला, केबिन क्रू नं दोरीनं बांधून ठेवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाच्या एका विमानातील आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या विमानात एक महिला वारंवार आपले कपडे काढण्याचा प्रयत्न करत होती, ज्यानंतर केबिन क्रू ने तिला रश्शी आणि टेपद्वारे सीटला बांधून ठेवले. 39 वर्षांची ही महिला विचित्र वागत होती आणि केबिन क्रू च्या निर्देशांचे पालन सुद्धा करत नव्हती.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, विमानाने उड्डाण घेताच, ही महिला आपल्या सीटवरून उठली आणि केबिनमध्ये विचित्र पद्धतीने इकडे-तिकडे फिरू लागली. व्लादिवोस्तोक शहरातून उड्डाण घेतल्यानंतर 15 मिनिटांच्या आतच महिला आपल्या अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न करू लागली होती आणि केबिन क्रू च्या निर्देशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती.

या महिलेची स्थिती पाहून केबिन क्रू सोबत काही लोकांनी या महिलेला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि तिला एक रश्शी, टेप आणि सीट बेल्टच्या आधाराने बांधून ठेवले जेणेकरून तिने आपले कपडे काढू नये आणि दुसर्‍या प्रवाशांना धोका उत्पन्न करू नये. ही महिला यानंतर अशाच स्थितीत संपूर्ण प्रवास करत होती आणि काही प्रवाशांनी तिच्यावर लक्ष ठेवले होते.

विमान जेव्हा Novosibirsk’s Tolmachevo एयरपोर्टवर लँड झाले, त्यानंतरच या महिलेला खाली उतरवण्यात आले आणि रशियाच्या पोलिसांनी तिला अटक केली. रशियाच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, या महिलेला ट्रान्सपोर्ट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे गेल्यानंतर या महिलेने मान्य केले की, तिने प्लेनमध्ये चढण्यापूर्वी एका सिंथेटिक ड्रगचा वापर केला होता, ज्यानंतर तिची स्थिती बिघडली.

या महिलेला पोलीस स्टेशनसह हॉस्पीटलमध्ये सुद्धा नेण्यात आले होते, जेणेकरून तिने किती ड्रग्ज घेतले आहे ते समजावे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 2018 मध्ये सुद्धा एक महिलेने नशा करून विमानात अशाचप्रकारे गोंधळ घातला होता.