बेवफाईचा होता संशय, प्रेयसीने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापून केला ‘फ्लश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   तैवानमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापून कमोडमध्ये टाकला. हुवांग असे जखमीचे नाव असून तो 52 वर्षाचा आहे. त्याला तीन मुले देखील आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा हुवांग झोपला होता. त्याच्या गर्लफ्रेंडला संशय होता कि तो तिला फसवत आहे. त्यामुळे रागाच्या भरात प्रेयसीने स्वयंपाक घरातील चाकूने ही घटना घडवून आणली. फुंग असे या महिलेचे नाव आहे.

माहितीनुसार, हुआंग आणि त्याची गर्लफ्रेंड फुंगने यापूर्वीच आपल्या पार्टनरसह घटस्फोट घेतला होता. 40 वर्षांची ही महिला गेल्या 10 महिन्यांपासून हुवांगबरोबर राहत आहे आणि तिने आधीच्या लग्नातून तैवानचे नागरिकत्व देखील घेतले आहे. या दाम्पत्याच्या शेजार्‍यांनी सांगितले की, त्याच्यांत अनेकदा वाद व्हायचे, त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेर येत असे. हुवांग एक ताओ श्राइन चालवतो आणि त्याच्या काही महिला मैत्रिणीही आहेत. यापैकी काहींशी तो अगदी जवळचा आहे. यामुळे त्याची गर्लफ्रेंड आणि त्याच्यात नेहमी भांडणही व्हायची.

52 वर्षीय हुआंग तैवानमध्ये राहतो. तो चिकन नूडल्स खाऊन आणि मद्यपान करून झोपी गेला. दरम्यान, जेव्हा जागी झाला तेव्हा त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्याचा प्रायव्हेट पार्टचा काही भाग गायब होता. हुआंगला जास्त रक्तस्त्राव झाला होता आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले की या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टचा दीड सेंटीमीटर भाग कापला गेला आहे. मात्र, त्याच्या शरीराचे इतर भाग सुरक्षित आहेत.

घटनेनंतर प्रेयसीने स्वतः मध्यरात्री पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. फुंगने असेही म्हटले की, तिने आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापून फ्लश केला. ज्यामुळे तो पुन्हा रीअ‍ॅटॅचमेंट सर्जरी करू शकणार नाही. या प्रकरणात, रुग्णालयाचे उपसंचालक म्हणाले – हुआंगला सतत रक्तस्त्राव होत होता, म्हणूनच आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. त्याला खाता-पिता येत आहे, पण अजूनही वेदना होत आहेत. प्रायव्हेट पार्ट कापल्यामुळे तो यापुढे संबंध ठेवू शकणार नाही. हा डॉक्टर पुढे म्हणाले की, त्याच्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे आर्टीफिशियल प्रायव्हेट पार्ट. या व्यतिरिक्त, त्याला रिकन्स्ट्रक्टिव सर्जरी आणि सायकोलॉजिकल काउंसलिंगची देखील आवश्यकता असेल. पुढील काही महिने हुवांगसाठी आव्हानात्मक असणार आहेत.

दरम्यान, या प्रकरणात हुवांगच्या प्रेयसीने त्याच्या जेवणात कोणत्याही प्रकारचे झोपेचे औषध किंवा ड्रग्स टाकले नव्हते ना? याचा पोलिस तपास करत आहेत. हुवांगचे यापूर्वी तीन वेळा लग्न झाले आहे आणि त्याला या तीन विवाहांमधून तीन मुले आहेत.