Google कडून झाली चूक? पतीसोबत बनवलेला महिलेचा प्रायव्हेट Video आईला पाठवला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात टेक्नॉलॉजी कोणत्या धोकादायक स्तरावर पुढे गेली आहे, त्याचा नमूना नुकताच कॅनडात पहायला मिळाला. सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असलेली ही महिला तेव्हा हैराण झाली जेव्हा गुगलच्या एका अ‍ॅपने तिचा अ‍ॅडल्ट व्हिडिओ तिच्या आईला पाठवला. या महिलेने हा सर्व प्रकार टिकटॉक व्हिडिओवर सांगितला. कारा टोनीन नावाच्या या महिलेने टिकटॉकवर सांगितले की, तिने आपल्या फोनमध्ये एका फिचरचा समावेश केला आहे. या फिचरनुसार, काराच्या मुलाची सर्व छायाचित्रे ऑटोमॅटिकली काराच्या आईकडे जातात. मात्र, हेच फिचर कारासाठी खुप महागात पडले.

कारा आपल्या पतीसोबत किचनमध्ये रोमान्स करत होती आणि बॅकग्राऊंडमध्ये तिच्या मुलाचे एक छायाचित्र फ्रिजवर लावलेले होते. गुगल फोटोने यानंतर काराच्या मुलाचे छायाचित्र बॅकग्राऊंडमध्ये असलेले हे छायाचित्र सुद्धा पिक केले आणि नंतर कारा आणि तिच्या पतीचा रोमँटिक व्हिडिओ सुद्धा कराच्या आईला पाठवला.

काराने टिकटॉक व्हिडिओमध्ये म्हटले की, जर तुम्ही गुगल फोटो किंवा कोणत्याही फोटो अ‍ॅपचा वापर करत असाल ज्यामध्ये चेहरा ओळखण्याची क्षमता आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. गुगल फोटो एक शक्तिशाली सॉफ्टवेयरच्या आधारे लोकांचे चेहरे ओळखते आणि यामुळेच मला लाजिरवाणे वाटले.

यानंतर सारा तणावात आली आणि तिने टिकटॉक व्हिडिओद्वारे आपल्या आईची माफी सुद्धा मागितली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे आणि अनेक लोक काराचे म्हणणे ऐकून खुप हैराण झाल्याचे दिसून आले आणि त्यांनी अ‍ॅडव्हान्स तंत्रज्ञानाबाबत चिंता सुद्धा व्यक्त केली.