नाना पेठेतील ‘त्या’ महिलेचा खुनी तिचा ‘प्रियकरच’, सासूने केला धक्कादायक खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य वस्तीतील एका सोसायटीमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा तिच्या प्रियकराने उशीने तोंड दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. राधा राधेश्याम शर्मा (वय ३०, रा. नाना पेठ) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी प्रेम माळी (रा. खडकी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे फिर्यादीच्या सासूने केलेल्या खुलाशामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी त्यांचे पती राधेश्याम शर्मा (वय ३६, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे मूळचे राजस्थानचे आहे. नाना पेठेतील पिंपरी चौकातील एका सोसायटीत ते राहतात. राधेश्याम शर्मा यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. कामानिमित्त ते कोल्हापूरला गेले होते. शनिवारी सकाळपासून ते पत्नीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत होते; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. पुण्यातील कामगाराने घरी जाऊन पाहिले तर इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी गाडी होती. पण, घराला कुलूप असल्याचे सांगितले. त्यांनी पुण्यातील सर्व नातेवाइकांकडे संपर्क साधला; पण कोणाकडेही त्यांची पत्नी नव्हती. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास शर्मा घरी परतले. त्या वेळी घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती समर्थ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा राधा मृतावस्थेत आढळून आल्या. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. शर्मा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

शर्मा यांची सासू सुमारे तीन महिन्यांपूर्वी अचानक त्यांच्याकडे आली होती, तेव्हा त्यांनी ‘कशासाठी आलात?’ अशी विचारणा केल्यावर त्यांनी ‘मी अचानक येऊ शकत नाही का?’ असा प्रतिप्रश्न विचारला. राधा फोन उचलत नसल्याने त्यांनी आपल्या सासूला फोन केल्यावर ‘ती प्रेम माळीबरोबर असेल; त्याच्याशी संपर्क साधा,’ असे सांगितल्यावर त्यांनी विचारणा केली. त्या वेळी सासूने त्यांना सांगितले, की रेश्मा हिचे पुण्यातील प्रेम माळी याच्याबरोबर प्रेमसंबंध आहे. ती प्रेमबरोबर पळून जाणार होती. तीन महिन्यांपूर्वी मी याच कामासाठी रेश्मा हिला समजावून सांगण्यास पुण्यात आले होते. त्यामुळे शर्मा यांना धक्का बसला. कारण प्रेम माळी याला ते चांगले ओळखत होते व तो शर्माप्रमाणेच व्यवसाय करतो. एक-दोन वेळा त्यांच्या घरीही आला होता. पोलिसांनी राधा यांच्या फोनची तपासणी केल्यावर राधेश्याम शर्मा यांना पुणे रेल्वे स्टेशनवर सोडल्यानंतर राधा यांनी प्रेम माळी याला फोन केल्याचे आढळले. राधा या घरी पोहचल्यावर प्रेम माळीही घरी आला. त्यानंतर त्यांच्या वाद झाल्याने प्रेमने राधाच्या तोंडावर उशी दाबून तिचा खुन केला. त्यानंतर बाहेरुन कुलूप लावून तो पळून गेला असावा. राधाची पडलेला मृतदेह, अंगावरील वस्त्रे आणि उशीला तिच्या लाळेचे डाग अशी सर्व घरातील सर्व परिस्थिती पाहिल्यावर पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला. प्रेम माळी याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या फोन बंद असल्याचे आढळून आले. तसेच त्याचे घरही बंद आढळले़ राधेश्याम शर्मा यांच्या फिर्यादीनुसार प्रेम माळी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like