‘रुबी हॉल’ रुग्णालयात महिलेची सोनसाखळी चोरली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

एका कंपनीच्या मार्फत ‘हेल्थ चेकिंग’ करण्यासाठी रुग्णालयात गेल्यानंतर महिलेची दीड तोळ्याची सोनसाखळी चोरीला गेली. हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करुन आरोपीला अटक केली. हा प्रकार हिंजवडी येथील ‘रुबी हॉल’ रुग्णालयात सोमवारी घडला.

जाहीरात 

या प्रकरणी संहिता पंढरीनाथ डिघूळे (३०, रा. कास्पटे वस्ती, वाकड) या महिलेने फिर्याद दिली आहे. तर रखमाजी गणपत पवार (३२, रा. माण, मूळ -सातारा) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिघुळे या संपूर्ण ‘हेल्थ चेकिंग’ करण्यासाठी सोमवारी सकाळी हिंजवडी येथील ‘हेल्थ चेकिंग’ करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी गळ्यातील सोनसाखळी काढून टेबलवर ठेवली होती.
टेबल वर ठेवलेली सोनसाखळी कोणीतरी चोरुन नेली. या प्रकरणी डिघुळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र पहिल्यांदा रुग्णालय व्यवस्थापनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयाकडे लेखी अर्ज केला. त्यानंतर फुटेज तपासले. त्यावेळी त्यामध्ये एक संशयित दिसला. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

[amazon_link asins=’B018X1HEKG,B018X1HENI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d79fce37-b1a3-11e8-8860-019245a9e20e’]

युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षाकडून युवकाचा खून