ज्या मुद्द्यावर फसले होते फडणवीस, आता महाराष्ट्रातील ‘महाविकास’ आघाडी समोरही तेच ‘आव्हान’

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सध्या अशा काही समस्यांचा सामना करत आहे, ज्याप्रमाणे एक वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस करत होते. 2019 च्या मान्सून दरम्यान मुसळधार पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील अनेक भागातील उभे पिक बरबाद झाले होते. तेव्हाचे राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक प्रभावित कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्यांनी लोकांना केवळ अश्वासने दिली, परंतु लोकांच्या मनात ही गोष्ट राहून गेली. त्याचवेळी विधानसभेसाठी निवडणूक प्रचार सुरू झाला, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी हा मुद्दा उचलून धरला होता.

जेव्हा पवारांनी प्रचाराची दिशा बदलली
निवडणूक प्रचारादरम्यान, सातारा येथे पावसात भिजत शरद पवार यांनी एक जबरदस्त भाषण केले होते. जे पाऊस आणि पूराने बेजार झालेल्या शेतकर्‍यांच्या मनाला भिडले होते. या जिल्ह्यांमध्ये भाजपाला काही जागांवर नुकसान झाले होते आणि एनसीपीला फायदा झाला होता. परंतु, बरोबर एक वर्षानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याचे हाल अगदी तसेच झाले आहेत. आताही अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सत्ताधारी आघाडीसमोर आव्हाने
टाइम्स नाउच्या एका रिपोर्टनुसार, पूरामुळे सोलापूर आणि त्याच्या जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या समस्यांमुळे सत्ताधारी महाविकास आघाडीला चिंतते टाकले आहे. तीनही पक्षाचे (काँग्रेस, शिवसेना आणि एनसीपी) मोठे नेते प्रभावित भागांचे सातत्याने दौरे करत आहेत.

नुकसान भरपाई देण्याची मागणी
एक वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस शेतकर्‍यांच्या संतापाचा सामना करत होते. यावेळी तेवढा संताप नसला तरी, लोक तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत. सीएम उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. सोबत काही शेतकर्‍यांना मदतीचे चेकसुद्धा वाटले आहेत.

पवारांनी केला प्रभावित ठिकाणांचा दौरा
प्रभावित ठिकाणांचा दौरा करणार्‍या नेत्यांमध्ये शरद पवार सर्वात पुढे आहेत. त्यांनी शेतकर्‍यांना विश्वास दिला आहे की, सरकार शेतकर्‍यांची योग्य काळजी घेईल. या दरम्यान कोरोनामुळे आर्थिक दृष्ट्या कठिण असलेल्या स्थितीत केंद्रांकडे त्यांनी मदत मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रभावित भागात मदत पोहचवण्यासाठी राज्य सरकारला कर्जसुद्धा घ्यावे लागेल. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा केला आहे.

आव्हानाला कसे तोंड देणार आघाडी
2019 च्या पूराकडे राज्यातील भाजपा सरकारची लोकप्रियता घटवणारा म्हणून देखील पाहिले जाते. आज सत्ताधारी आघाडी सुद्धा जवळपास त्याच कठिण काळातून मार्गक्रमण करत आहे. कोविड-19 ने महाराष्ट्र देशातील सर्वाधिक पीडित राज्य आहे. महामारीशी लढण्यात राज्य सरकारचा मोठा निधी खर्च झाला आहे. याच आर्थिक कारणामुळे आघाडीला शेतकर्‍यांना मदत करणे अवघड होणार आहे.