सोलापूरमधील दुर्देवी घटना ! गवत कापण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकर्‍याचा शॉक लागून मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   गवत कापताना शेतात पडलेल्या महावितरणच्या तारांना स्पर्श झाल्याने शॉक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सोलापुरातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावात ही घटना घडली आहे.

अरुण खांडेकर (वय34) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. या तरुण शेतकर्‍याच्या मृत्यूमुळे महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.

मागील दोन महिन्यांपासून अरुण खांडेकर यांच्या शेतात महावितरणच्या तारा जमिनीवर पडून होत्या. त्याबाबत ग्रावकर्‍यांकडून वारंवार महावितरणला लेखी तसेच तोंडी निवेदन दिले होते. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने अरुण खांडेकर यांचा शॉक लागून मृत्यू झाला, असे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, बक्षी हिप्परगा गावात अरुण खांडेकर हे यांचे शेत आहे. गवत कापण्यासाठी सकाळी ते आपल्या शेतात गेले होते. यावेळी शेतात पडलेल्या महावितरणच्या तारांना स्पर्श झाल्याने जबरदस्त त्यांना शॉक लागला. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर म्हणाले की, पीडित कुटुंबास योग्य ती नुकसान भरपाई दिली देण्यात येईल. तसेच ज्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी कामात कसूर केली त्यांच्यावरही करवाई केली जाईल. यासाठी चौकशी समिती नेमली जाणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like