पत्नीला पुरण्यासाठी घरातच बनवली पक्की ‘कब्र’, जिद्दीवर आडून राहिला युवक, दृश्य पाहून अधिकारी ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरातून एक खबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीच्या निधनानंतर एका व्यक्तीने तिला घरीच दफन करण्याची योजना आखली. त्यासाठी कबर देखील तयार केली. परंतु याची माहिती मिळाल्यावर आसपासच्या लोकांनी गोंधळ उडविला. पोलिसांनी समजविल्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यास मान्य केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराजची पत्नी सईदा (वय 50, रा. मोबिन नगर, लिसाडी गेट) 1 फेब्रुवारीला घरातच पन्नास टक्क्यांहून अधिक जळाली होती. रुग्णालयात काही दिवस उपचारानंतर सिराजने पत्नीला घरी आणले. मात्र रविवारी सकाळी साईदाचे निधन झाले. घरात पत्नीला दफन करण्यासाठी सिराजने कबर तयार केली. रात्री दहाच्या सुमारास कशी तरी लोकांना याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी घराच्या आत प्रवेश केला. तिथले दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. कबर तयार होती. हे पाहून लोक संतप्त झाले व त्यांनी निषेध केला. त्यांनतर रात्री उशिरा सिराज आपल्या पत्नीला स्मशानात दफन करण्यास तयार झाला. लोकांनी त्याच्यासाठी देणगीही गोळा केली.

लोकांच्या गोंधळानंतर सिराज पत्नीची कबर बनवण्याविषयी बोलत राहिला. तो म्हणाले की, ते त्याचे घर आहे. तो आपल्या बायकोला कुठेही जाऊ देणार नाही. लोक त्याच्या निषेधार्थ उभे राहिले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाची चौकशी केली. पोलिसांसमोरही सिराज आपल्या पत्नीची कबर बांधण्याच्या गोष्टीवर अडून राहिला. मात्र त्यांनतर, पोलिसांच्या आणि लोकांच्या बोलण्यावर मान्य झाला.

रविवारी सकाळी 11 वाजता या महिलेचा घरीच मृत्यू झाला. तिच्या नवऱ्याने कबर खोदून त्याला पक्के बनविण्याचे काम केले. संध्याकाळपर्यंत कोणालाही याचा सुगावा लागला नाही. मात्र त्यांनतर हे रहस्य उघडले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती नव्हती. नंतर माहिती मिळताच इंस्पेक्टर लिसरी गेट प्रशांत कपिल घटनास्थळी दाखल झाले. सीओ कोतवाली दिनेश शुक्ला म्हणाले की, लोकांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. नंतर सिराजने पत्नीला स्मशानभूमीत नेण्यास सहमती दर्शविली.