कोरोना काळात 700 पेक्षा जास्त लोकांना फ्री लान्सर म्हणून काम देणारा तरूण !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, परंतु असा एक तरुण या काळात पुढे आला ज्यानं त्याच्या कंपनीअंतर्गत शेकडो तरुण-तरुणींना नोकऱ्या दिल्या. या काळात त्यानं सर्वांना घरून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली.

महेंद्र निकम असं या तरुणाचं नाव आहे. महेंद्रनं कोरोना महामारीच्या काळात त्याची कंपनी महेंद्र टेक्नोसॉफ्ट ( Mahendra Technosoft Pvt.Ltd. Baner, Pune) अंतर्गत 700 पेक्षा जास्त लोकांना फ्री लान्सर म्हणून काम दिलं. त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली.

मेहेंद्रनं दिलेल्या या कामामुळं कोरोना काळात अनेकांना उत्पन्नासाठी मदतीचा हात मिळाला आणि मोलाची मदत झाली. जवळपास त्यानं 1.76 कोटी रुपये फ्री लान्सरच्या सॅलरीसाठी खर्च केले आहेत. महेंद्रनं दिलेल्या या कामामुळं 700 पेक्षा जास्त कुटुंबांना मदत मिळाली.