घरी जाण्यासाठी बायको आणि मुलाला घेऊन चालवली 750 KM सायकल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी लोक अडकून पडले असून गरीब आणि मजुरांचे हाल होत आहेत. काम नसल्यामुळे घरात अन्नधान्य शिल्लक राहिले नाही. त्यामुळ मूळ गावी जाण्यासाठी कुणी पायी चालत तर कुणी सायकलवर शेकडो किमी चालत घर गाठत आहेत. हरियाणात काम करणार्‍या उत्तर प्रदेशातल्या राजेंद्र या युवकाने बायको आणि मुलाला घेत 750 किमी सायकल चालवत घर गाठले आहे.

उत्तर प्रदेशातल्या धर्मपूरी इथं राहणारा राजेंद्र हा हरियाणातल्या फरिदाबाद इथे ठेकेदारी करतो. लॉकडाऊनमुळे त्याचे काम गेल्यामुळे जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने बायको आणि एक वर्षाच्या मुलाला सायकलवर बसवित 5 दिवसात 750 किमी सायकल चालवित घर गाठले आहे. मात्र, जिल्ह्यात प्रवेश करताच प्रशासनाने त्याची तपासणी केली आणि 14 दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये त्याला ठेवले आहे.

आता 14 दिवसानंतर प्रमाणपत्र मिळाल्यावरच त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. दरम्यान कोरोनामुळे देशातला लॉकडाऊनचा कालावधी आणखी 15 दिवस वाढविण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्रक काढले आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता देशवासियांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. सकाळी 10 वाजते पंतप्रधान बोलणार आहेत. ते काय बोलतील, कुठल्या घोषणा करतील याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.