Lockdown : सगळयांना ‘गुंगारा’ देत सांगलीत प्रवेश करणार्‍या मुलीला ‘कोरोना’ची लागण, 5 जणांविरूध्द FIR

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातील एका तरुणीचा अहवाल शुक्रवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर तरुणीला काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवेचा वापर करून मुंबईतून सांगलीला आणण्यांत आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोलिसांनी त्या कोरोना संसर्गित तरुणी व तिच्या भावाला मुंबईहून आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ५ व्यक्तींवर पोलिसांनी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलायं. ही तरुणी १६ एप्रिल रोजी मुंबईहुन आली होती. मात्र काल तिचा अहवाल कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने हा सगळा प्रकार समोर आलायं.

सांगली जिल्ह्याचा धोका कायम

शिराळा तालुक्यातील निगडीमधील एक तरुणी कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबातील ११ जणांना प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ही तरुणी १६ एप्रिल रोजी मुंबईतून शिराळा तालुक्यातील निगडी या आपल्या गावी आली होती, ती कशी आली याचा तपास झाल्यानंतर पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. शिराळा तालुक्यातील फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून होत असलेल्या तपासणीत या तरुणीविषयी शंका आल्याने तिचा घशाचा स्वॅब तपासणी साठी घेण्यात आला होता. त्यांनतर तिला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं.

यापूर्वी देखील जिल्ह्यात घडला विचित्र प्रकार

सांगलीतील खेराडे वांगीतील व्यक्ती मुंबई येथे मयत झाल्यानंतर त्याचे सायन हॉस्पिटल प्रशासनाने स्वॅब घेतले होते. मात्र, असे असताना देखील या व्यक्तीचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बाहेर का काढले? ही हॉस्पिटल प्रशासनाची मोठी चूक असल्याचं कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्य सचिव अजोय मेहता यांना यासंदर्भात पत्र देखील लिहलं.

दरम्यान, या मृत व्यक्तीवर १९ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु मृत व्यक्ती ही कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून २२ एप्रिल रोजी सांगितले. ही माहिती समोर आल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील नागरिक पुन्हा दहशतीच्या सावटाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे.