पुण्यातील ‘या’ उड्डाण पुलावर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीसांच्या वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. एका तरुणाने उड्डाण पुलावर साडीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस ऐन वेळेस तेथे दाखल झाल्याने होणारा मोठा अर्नथ टळला. त्याला आत्महत्या करण्सापासून रोखण्यात आले. पिंपरी चिंचवड येथील हा तरूण आहे.

निगडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे समजत आहे. आई-वडिलांना कोण सांभाळणार यावरुन भावासोबत झालेल्या भांडणानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले होते. आई-वडिलांना घेऊन असे अनेक वाद होत असतात अशा अनेक घटना तुम्ही आधीही पाहिल्या असतील. वयोवृद्ध आई-वडिलांना सांभाळण्यावरून अनेकदा मुलांमध्ये वाद होतात. अशीच घटना समोर आली आहे.

सदर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव पवन भंडारी आहे. पवन आणि त्याच्या भावाचा आई-वडिलांना कोण सांभाळणार यावरून वाद झाला. वादाचं रुपांत भांडणात झालं. यावरून पवन याने असे टाेकाचे पाऊल उचलले. सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर असणाऱ्या मधुकर पवळे उड्डाण पुलावर ही घटना घडली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.
पवनचे आई-वडिल खेड येथे राहत आहेत. ते अपंग आहेत अशी माहिती समोर आली आहे. पवनचा भाऊ  विप्रो कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.