पुणे महापालिका काँग्रेस पक्ष गटनेतेपदी आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस पक्षात शहराध्यक्ष आणि महापालिकेतील गटनेता बदलण्याच्या हालचाली गेल्या चार पाच महिन्यांपासून चालू होत्या. त्यात गटनेतेपदात बदल करण्यात आला असून अरविंद शिंदे यांच्या जागी ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच शहराध्यक्ष बदलणार की रमेश बागवेच राहाणार याविषयी पक्षात उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्यानंतर शहरांचे अध्यक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थामधील नेते बदलले जातील हे स्पष्ट होते. पुणे महापालिकेतील गटनेते बदलण्यासाठी थोरात यांनी निरीक्षक पाठविले होते, त्यावेळी बदल झाला नाही. संघटनात्मक बदलाच्या हालचाली सुरू झाल्यावर पक्षनेते बदलण्यात आले आणि आबा बागुल यांची महापालिकेतील गटनेतेपदी निवड झाली. गटनेतेपदाची सूत्रे उद्या (मंगळवारी) आबा बागुल स्वीकारणार आहेत.