अभिनेत्री तारा सुतारिया बनणार करीनाची ‘वहिनी’ ? अरमानच्या लग्नात मिळाला ‘ग्रीन’ सिग्नल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अरमान जैन आणि त्याची गर्लफ्रेंड अनीसा मल्होत्रा 3 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाले. मोठ्या धुमधडाक्यात हे लग्न पार पडलं. या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या लग्नात बिग बी अमिताभ बच्चन सहित बिजनेसमन अनिल अंबानी आले होते. अशात आदर जैनची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड स्टार तारा सुतारिया हिनं या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

तारानं या लग्नात लाईट पिंक पेस्टल शेड लहंगा घातला होता. ताराचा लुक सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. तारा या लग्नात जे सादरीकरण केलं त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एका रिपोर्टनुसार, ताराचं गाणं ऐकून आदर जैनच्या आईनं ताराला सून करून घ्यायचं निश्चित केलं. तारा जेव्हा गाणं गायल्यानंतर स्टेजवरून खाली उतरली तेव्हा रीमा यांनी तिला अलिंगन दिलं आणि किसही केलं. रीमा म्हणाल्या, “तारा आणि आदर लवकरच लग्न करतील. त्यांनी लवकरच लग्न फिक्स करायला हवं आणि आपल्या भावाप्रमाणे सेटल व्हावं.

रीमा यांच्याबद्दल समोर आलेल्या या वृत्तावरून समजत आहे की, तारा आणि आदर एकमेकांना डेट करत आहेत. तारा आणि आदर लवकरच लग्न करण्याची शक्यता आहे. आता अरमानच्या लग्नानंतर आदर आणि ताराच्या लग्नलाही आई रीमा यांचा हिरवा सिग्नल मिळाला आहे. आता ते कधी लग्न करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.