५० हजाराहून अधिक कॅश व्यवहार करणाऱ्यांसाठी ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीनामा ऑनलाईन – तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करता का?, करत असाल तर अर्थसंकल्पातील हा बदल तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. दरवर्षी ५० हजाराहून अधिक रोख रक्कम व्यवहार करत असाल तर त्यासाठी आपल्याला पॅनकार्ड ऐवजी आधार कार्डचा वापर करता येणार आहे. ज्या ज्या कामासाठी पॅन कार्डचा वापर केला जायचा त्या प्रत्येक कामासाठी पॅन कार्ड नसेल तर आधार कार्ड वापरता येणार आहे.

महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी या संबधी माहिती दिली आहे. सामान्यतः ज्या जागेंवर पॅन कार्डची गरज लागायची तेथे आता आधार कार्डचा वापर करता येणार आहे. त्यासाठी बँक आणि दुसऱ्या संस्थांनी आपल्या बॅकएंड को अपग्रेड करावे लागेल, असं अजय भूषण पांडे यांनी सांगितलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थ संकल्पात आयटीआर भरण्यासाठी पॅन कार्डची गरज लागायची ती बदलून आयटीआर भरण्यासाठी आधार कार्डचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसंच जेथेही पॅन कार्डचा वापर केला जायचा तिथं आधार नंबर दिले तरी आपल्याला आपले काम करता येणार आहे.

काळा पैसा रोखण्यासाठी ५० हजारांपेक्षा अधिक रोख व्यवहार करण्यासाठी परदेशात किंवा हॉटेलमध्ये पॅन नंबर देणे आवश्यक असते. तसंच १० लाखांहून अधिक संपत्ती खरेदी करण्यावर ही पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक असते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या भारतात २२ कोटी पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक आहेत. तर देशात १२० कोटीपेक्षा अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे कोणाला पॅनकार्ड बनवायचे झाले तरी त्याला आधी आधार कार्डचा वापर करावा लागेल. तेव्हा पॅन कार्ड जनरेट होते. परंतु आता आधार कार्ड असल्यास त्यांना पॅन कार्डची गरज भासणार नाही.

दरम्यान, कर भरण्यासाठी पॅनची आवश्यकता कमी झाली असली तरी पॅन कार्ड पूर्णतः बंद करण्यात येणार नाही. कारण अनेक लोकांना आधार कार्डच्या जागेवर पॅन कार्डचा वापर करणे सोयीस्कर जाते. त्यामुळे कर भरण्यासाठी आधार कार्डसह पॅन कार्डचाही वापर करता येणार आहे. परंतू बँकेंच्या बॅकेन्ड सिस्टीममध्ये पॅनच्या जागेवर आधारच असणार आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय