Aadhaar Card | तुमच्या ‘आधार’ द्वारे किती Sim झाले अ‍ॅक्टिव्हेट, ‘या’ पध्दतीनं ऑनलाइन जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card | अनेकदा असे होते की, आपले ओळखपत्र विशेषता आधारकार्ड (Aadhaar Card) वर कुणी दुसरा व्यक्ती सिम वापरत असतो आणि आपल्याला समजत देखील नाही. तुमच्या आधार नंबरसोबत किती मोबाईल सिम (Mobile Sim) लिंक्ड आहेत, हे सहज जाणून घेऊ शकता. जर तुम्ही यापैकी एखाद्या सिमचा वापर करत नसाल तर ते तुम्ही बंद करू शकता.

 

तुमच्या आधार नंबर (Aadhaar) वर किती सिम अ‍ॅक्टिव्ह आहेत, हे जाणून घेण्यासाठी सरकारने एक पोर्टल तयार केले आहे. दूरसंचार विभागाने (DoT) अलिकडेच एक पोर्टल टेलिकॉम अनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) लाँच केले आहे. या पोर्टलद्वारे यूजर्स आपल्या आधार नंबरसोबत जोडल्या गेलेल्या सर्व फोन नंबरची तपासणी करू शकतात. (Aadhaar Card)

 

TAFCOP वेबसाइटद्वारे तुमच्या आधारकार्डवर किती सिम जारी करण्यात आली आहेत ते समजू शकते. एखादा नंबर तुमच्या माहितीमधील नसेल तर तक्रार करू शकता. तसेच तुमच जुने नंबर आणि वापरात नसलेले नंबर सहजपणे आधारपासून वेगळे करू शकता.

असे चेक करा लिंक्ड SIM

सर्वप्रथम दूरसंचार विभागाचे पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in वर व्हिजिट करा.

येथे 10 अंकी मोबाइल नंबर नोंदवा.

यानंतर मोबाइल नंबर व्हेरिफिकेशनसाठी मोबाइलवर ओटीपी येईल.

हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नंबर व्हेरिफाय होईल.

तुमच्या सर्कलमध्ये सुविधा उपलब्ध असेल तर व्हेरिफिकेशन नंतर सर्व मोबाईल नंबरची लिस्ट येईल, जे तुमच्या आयडीवर सुरू आहेत.

जर तुम्हाला वाटत असेल की एखादा नंबर असा आहे ज्याची तुम्हाला माहिती नाही तर त्या नंबरची तक्रार याच पोर्टलवर करू शकता.

सरकार तुम्ही सांगितलेल्या नंबरची चौकशी करेल.

जर नंबर तुमच्या आयडीवर चालत असल्याचे आढळले तर तो ब्लॉक केला जाईल.

ही प्रकिया तुम्हाला पुढील सर्व संभाव्य नुकसानापासून वाचवू शकते.

 

Web Title :- Aadhaar Card | aadhaar card check how many sim card numbers are issued to your aadhaar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Imported liquor Rates | मद्यप्रेमींसाठी खुशखबर ! विदेशी दारू झाली स्वस्त, आयातीचे विशेष शुल्क दर कमी केल्याने किंमत निम्यावर

Ankita Lokhande | लवकरच अंकिता लोखंडेच्या घरी वाजणार सनई चौघडे; 3 दिवसानंतर होणार ‘नवरी’

MLA Gopichand Padalkar | एसटी कामगार संपावरून पडळकरांचा सरकारवर आरोप; म्हणाले – ‘मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..’