आता मोबाइल नंबर रजिस्टर न करता डाऊनलोड करू शकता Aadhaar Card, खुप सोपी आहे पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Aadhaar Card | जर तुम्हाला आधार कार्ड (Aadhaar Card) ची अचानक गरज भासली तर ताबडतोब ऑनलाइन डाऊनलोड करू शकता. मोबाइल नंबर आधारसोबत लिंक केलेले नसेल तर अनेक कामे अडकू शकतात. परंतु टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही कारण आता असे होणार नाही.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्ही तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर न करता सुद्धा आधार कार्ड (Aadhaar Card) डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला यूआयडीएआयच्या वेबसाइटवर लॉगइन करावे लागेल. याची पद्धत सुद्धा खुप सोपी आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना आधार सेवा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. ऑफलाइन सेवा केवळ रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून एसएमएस (SMS) पाठवल्यानंतरच उपलब्ध होईल.

मोबाइल नंबर रजिस्टर्ड नसताना डाऊनलोड करा आधार

1. सर्वप्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.

2. होम पेजवरून My Aadhaar मध्ये दिलेल्या Order Aadhaar Reprint वर क्लिक करा.

3. आपला 12 अंकाचा आधार नंबर किंवा 16 अंकाचा व्हीआयडीएन किंवा 28 अंकाचा एनरॉलमेंट आयडी टाका. नंतर सिक्युरिटी कोड टाका.

4. नंतर My Mobile number is not registered वर क्लिक करा.

5. नंतर alternative number किंवा non-registered मोबाइल नंबर टाका.

6. यानंतर Send OTP वर क्लिक करा आणि ओटीपी टाकून सबमिटवर क्लिक करा.

7. नंतर पेमेंटचा पर्याय निवडा. नंतर पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डिजिटल हस्ताक्षर जमा करा.

8. SMS द्वारे एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) जेनरेट होईल. यातून स्टेटस ट्रॅक करू शकता.

 

ZE PVC आधार कार्डसाठी असा करा अर्ज

1 सर्वप्रथम युआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in ओपन करा.

2 त्यानंतर माय आधार सेक्शनमध्ये ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा.

3 यावर क्लिक करताच तुम्हाला 12 अंकांचा आधार क्रमांक किंवा 16 आकडी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकांचा ईआयडी नोंदवावा लागेल. या तिनपैकी एक टाकावा लागेल.

4 आधार नंबर टाकल्यानंतर खाली सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा कोड टाका.

5 यानंतर खाली सेंड ओटीपीवर क्लि करा. ज्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

6 ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा.

7 यानंतर स्क्रीनवर पीव्हीसी कार्डची प्रीव्ह्यू कॉपी येईल, ज्यामध्ये डिटेल्स असतील.

8 शेवटी पेमेंट ऑपशन येईल. त्यावर क्लिक करून अनेक डिजिटल माध्यमाने 50 रुपये भरू शकता.

9 15 दिवसांच्या आत स्पीड पोस्टने कार्ड तुमच्या घरी पोहचेल.

 

Web Title : Aadhaar Card | aadhaar card download without register your mobile number check complete process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोने पुन्हा ‘स्वस्त’ ! सर्वोच्च स्तरापासून 10799 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

PMC GB | दोन दिवसांच्या पुणे महापालिकेच्या GB मध्ये तब्बल 346 प्रस्ताव मांडले, 158 प्रस्ताव मान्य !

Pune News | ग्रामीण पोलिसांकडून सोमेश्वरनगर, पणदरे, मोरगाव, सुपे, वडगाव निंबाळकर येथे आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद