Aadhaar Card | आधार कार्डबाबत केंद्राची नवीन अ‍ॅडव्हायजरी, फोटोकॉपी शेअर करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card | आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेणे किंवा आर्थिक व्यवहार करणे, अशा अनेक महत्त्वाच्या कामांसाठी या कार्डाची (Aadhaar Card) आपल्यासाठी विशेष उपयुक्तता आहे. आधार कार्ड हा तुमच्या ओळखीचा पुरावा आहे. त्यात 12 अंकाचा न्यूमेरिक डिजिट असतो.

 

हे ’न्यूमेरिक’ अंक तुमची बायोमेट्रिक ओळख सुनिश्चित करण्यासाठी कार्य करतात. अशा परिस्थितीत आधार कार्ड वापरताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेकदा आपण आपल्या आधार कार्डची प्रत कोणाहीसोबत कुठेही शेअर करतो. तुम्हीही ही चूक करत असाल तर तुम्ही ताबडतोब सावध व्हायला हवे.

 

तुमच्या या निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. याबाबत सरकारने इशारा दिला आहे. आपल्या मार्गदर्शक तत्त्वात सरकारने फक्त मास्क्ड आधार कार्ड (Masked Aadhaar Card) इतर लोकांसोबत शेअर करण्यास सांगितले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया –

 

सरकारने सांगितले आहे की, आधार कार्डची (Aadhaar Card) प्रत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेसोबत शेअर केल्यास ती चुकीच्या पद्धतीने वापरली जाऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. लोकांना मार्गदर्शक तत्त्वे देताना सरकारने म्हटले आहे की, नेहमी फक्त मास्क्ड आधार कार्ड इतर लोक किंवा संस्थांसोबत शेअर करा.

 

मास्क्ड आधार कार्ड काय आहे (What Is Masked Aadhaar Card)

मास्क्ड आधार कार्डमध्ये तुमच्या 12 अंकी न्यूमेरिक कोडची पूर्ण संख्या प्रदर्शित केलेली नाही. मास्क्ड आधारमध्ये, आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे 4 अंक दिसतात.
तुम्ही मास्क्ड आधार कार्ड ऑनलाइन सहज डाउनलोड करू शकता.

 

सायबर कॅफेमधून करू नका आधार कार्ड डाउनलोड

सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही कधीही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू नका.
जर तुम्ही सायबर कॅफेला भेट देऊन तुमचे आधार कार्ड डाउनलोड करत असाल,
तर अशा परिस्थितीत तुम्ही संगणकातील आधार कार्डची डाउनलोड केलेली फाईल कायमची डिलीट करावी.

 

मास्क्ड आधार कार्ड कसे डाउनलोड करावे (How To Download Masked Aadhaar Card)

जर मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जाऊन ’आधार डाउनलोड करा’ हा पर्याय निवडावा.

त्यानंतर आधार/व्हीआयडी/नोंदणी आयडी या पर्यायावर क्लिक करा आणि मास्क्ड आधार कार्ड या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर, तुम्हाला काही महत्त्वाची माहिती जसे की आधार क्रमांक इत्यादी भराव्या लागतील.

नंतर ’ओटीपी रिक्वेस्ट’ या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड येईल,
म्हणजेच आधार कार्डशी लिंक केलेला नंबर, जो तुम्हाला टाकावा लागेल.

त्यानंतर ’आधार डाउनलोड करा’ वर क्लिक करा. यानंतर मास्क्ड आधार कार्ड सहज डाउनलोड करता येईल.

 

Web Title :- Aadhaar Card | aadhaar card govt alert never share your addhaar copy otherwise you will face big problem

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा