तुमचा मोबाइल नंबर बदलला आहे का? तात्काळ Aadhaar Card सोबत करा लिंक, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

नवी दिल्ली : Aadhaar Card | जर तुमचा आधारसोबत लिंक असलेला मोबाइल नंबर (How to Link your number with aadhaar card) बंद झाला असेल, हरवला असेल किंवा तुम्हाला दुसरा नंबर लिंक करायचा असेल तर तुम्हाला यासाठी आधार रजिस्ट्रेशन सेंटरवर (Aadhaar Registration Center) जाऊन अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागेल.

mAadhaar अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी सुद्धा सर्वप्रथम तुमचा रजिस्टर मोबाइल नंबर मागितला जाईल.
परंतु जर तुमचा मोबाइल नंबर (Update Mobile Number in Aadhaar Card) बदलला असेल तर आधारच्या व्हेरिफिकेशनसाठी तुमच्याकडे OTP येणार नाही.

अशाच स्थितीत हे आवश्यक आहे की तुम्ही आधारसोबत लिंक्ड तुमचा मोबाइल नंबर बदला. तुम्ही तुमचा सध्याचा मोबाइल नंबर आधारसोबत लिंक करू शकता आधार नंबरसोबत नवीन मोबाइल नंबर लिंक करण्याची सोपी पद्धत जाणून घेवूयात…

Pune Crime | 27 वर्षीय नियोजीत पत्नीला जेवणास नेलं फार्म हाऊसवर आणि केलं ‘हे’ कृत्य; पुण्याच्या कोंढावा परिसरातील धक्कादायक घटना

असा करा आधारमध्ये नवीन फोन नंबर अपडेट

1. सर्वप्रथम आधार रजिस्ट्रेशन सेंटरवर जा.

2. फोन नंबर लिंक करण्यासाठीचा एक फॉर्म येथे दिला जाईल.

3. या फॉर्मला आधार करेक्शन फॉर्म म्हणतात. यामध्ये सर्व माहिती अचूक भरा.

4. आता 25 रुपयांच्या फीसह भरलेला फॉर्म अधिकार्‍याकडे जमा करा.

5. यानंतर एक स्लिप दिली जाईल. या स्लिपमध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल. या रिक्वेस्ट नंबरवरून हे चेक करू शकता की नवीन फोन नंबर आधारसोबत लिंक झाला आहे किंवा नाही.

6. तीन दिवसात आधार नवीन मोबाइल नंबरसोबत लिंक केले जाईल. लिंक झाल्यानंतर त्याच नंबरवर ओटीपी येईल.

7. या ओटीपीचा वापर करून ऑनलाइन आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

8. आधारसोबत नवीन मोबाइल नंबर लिंक केल्याचे स्टेटस UIDAI चा टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करून सुद्धा जाणून घेऊ शकता.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीनं केलं पत्नीच्या मोबाईलमध्ये ‘स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर’ सॉफ्टवेअर डाऊनलोड, पुढं झालं असं काही की प्रकरण…

PM Modi | पीएम मोदींनी सांगितलं आपल्या बालपणीचे अलीगढ ‘कनेक्शन’, म्हणाले – ‘वडिलांकडे पैसे ठेवत होता अलीगढचा मुस्लिम व्यापारी’

Maharashtra Police | पुणे, नागपूर पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ ! कम्युनिटी पोलिसिंगवर भर, माहिती तंत्रज्ञानाची उत्तम सांगड घालणार्‍या गडचिरोलीला ‘दुहेरी’ यश, औरंगाबाद, रायगडही ‘अव्वल’स्थानी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Aadhaar Card | aadhaar card latest news how to do aadhaar card link on changing mobile number here is the step by step process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update