Aadhaar Card लॉक आणि अनलॉक करण्याची पद्धत, कुणीही करू शकणार नाही आधार कार्डचा चुकीचा वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक असे कागदपत्र बनले आहे, जे कोणत्याही व्यक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड व्यक्तीची ओळख म्हणून स्वीकारले जाते. आधार कार्ड केवायसी दस्तऐवज म्हणून सुद्धा बँकांमध्ये स्वीकारले जाते. बँकांसह अशी अनेक कामे आहेत, ज्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे.

 

मात्र, गेल्या काही दिवसांत लोकांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशावेळी, कोणत्याही आधार कार्ड धारकाला त्यांचे आधार कार्ड कसे सुरक्षित ठेवायचे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून इतर कोणीही त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकणार नाही.

 

UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड जारी केले जाते. आधार कार्डचे सुरक्षा वैशिष्ट्य म्हणून, युआयडीएआय ते लॉक आणि अनलॉक करण्याची सुविधा देखील प्रदान करते. म्हणजेच, आधार कार्डचा गैरवापर होण्यापासून संरक्षण करण्यासाठी, कोणतीही व्यक्ती आपले आधार कार्ड लॉक करू शकते आणि जेव्हा त्याला ते वापरायचे असेल तेव्हा ते अनलॉक करू शकतो.

Aadhaar Card लॉक आणि अनलॉक कसे करावे?

UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या- https://uidai.gov.in/.

प्रथम My Aadhaar, नंतर ’Aadhaar Services’ आणि नंतर Lock/Unlock Biometrics पर्याय निवडा.

येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी नोंदवा.

Captcha कोड नोंदवा आणि नंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा.

यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल, तो दिलेल्या जागेत भरा.

बायोमेट्रिक डेटा लॉक/अनलॉक करण्याचा पर्याय निवडा.

आता तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक होईल.

 

Web Title :- Aadhaar Card | aadhaar card lock unlock process to prevent from being misused

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Model Found Dead | 21 वर्षांची प्रसिद्ध मॉडल-अभिनेत्रीचा वाढदिवशी झाला मृत्यू, सुसाईड की मर्डर?

 

Pune Crime | कामाला येत नसल्याच्या रागातून महिलेचे अश्लील फोटो व्हायरल; पती-पत्नीवर FIR

 

BJP on Shivsena | भाजपचं शिवसेनेला आव्हान; म्हणाले – ‘हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता, औवेसींवर गुन्हा दाखल करा’