Aadhaar Card | आधार सर्व्हिससाठी लावावी लागणार नाही मोठी रांग, घरबसल्या होईल सर्व काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड (Aadhaar Card ) वापरकर्ते लवकरच घरबसल्या UIDAI शी संबंधित सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतील. साधारणपणे, कोणतीही आवश्यक माहिती अपडेट करण्यासाठी किंवा आधारसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचे जवळचे आधार केंद्र शोधावे लागेल. त्यानंतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या केंद्रांना भेट द्यावी लागली. आता UIDAI आधार कार्डधारकांना घरीपोच सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहे. (Aadhaar Card)

 

या सेवा घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी यूआयडीएआय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देत आहे. आधार सेवा घरोघरी उपलब्ध व्हावी यासाठी यूआयडीएआय पोस्टमनना प्रशिक्षण देत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payment Bank) काम करणार्‍या 48 हजार पोस्टमनना या विशिष्ट कामासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

 

या पोस्टमनना मोबाईल नंबरशी आधार लिंक करणे, मूलभूत माहिती अपडेट करणे आणि आधार डेटाबेसमध्ये मुलांची नोंद करणे यासारख्या सेवा देण्यासाठी देशाच्या दुर्गम भागात पोहोचण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. (Aadhaar Card)

 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सेवांचे बुकिंग ऑनलाइन किंवा टेलिफोनद्वारे केले जाईल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

नवीन प्रशिक्षकांना यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नोंदी नोंदवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी काही मूलभूत उपकरणे दिली जातील. त्यांना आवश्यक आधार सेवा प्रदान करण्यासाठी लॅपटॉप आणि बायोमेट्रिक स्कॅनरसारखे आवश्यक हार्डवेअर प्रदान केले जातील.

 

यूआयडीएआय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये काम
करणार्‍या सुमारे 13,000 बँकिंग करस्पॉडंटना देखील सहभागी करून घेतला जाऊ शकते.

 

याशिवाय देशातील सर्व 755 जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रेही (Aadhaar Sewa Kendra) असतील.
ही केंद्रे पोस्ट पेमेंटसाठी हब प्रमाणे काम करतील आणि कलेक्शन पॉईंटवरून डाटा मेन फ्रेममध्ये अपडेट करतील.
हे जलद अपडेट करेल आणि एन्रॉलमेंटचा वेग वाढवेल. आतापर्यंत 72 शहरांमध्ये 88 यूआयडीएआय सेवा केंद्रे आहेत.

 

सध्या, यूआयडीएआय काही कार्ड वापरकर्त्यांसाठी ऑनलाइन सेवा प्रदान करते. उदाहरणार्थ, यूजर्स यूआयडीएआय वेबसाइटवरून ई-आधार डाउनलोड करू शकतात.

 

VID नावाचा टोकन क्रमांक जारी करून तुमचा वैयक्तिक आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी
तुम्ही व्हर्च्युअल आयडी किंवा व्हीआयडी देखील तयार करू शकता.
फिजिकल सेंटरमध्ये गेल्यानंतर सर्व्हिस रिक्वेस्ट ट्रॅक करू शकता.

 

Web Title :- Aadhaar Card | aadhaar card service at home how to use without any line

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून ‘शिपाई’ पदावर नियुक्तीचे बनावट पत्र; महापालिका प्रशासन चक्रावून गेले

 

Latur Crime |  धक्कादायक ! महिलेने 72 वर्षाच्या व्यक्तीसोबत बनवला अश्लिल व्हिडीओ, 15 लाखाचं ‘मॅटर’

 

Udayanraje Bhosale | ‘हिंमत असेल तर दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ या’, उदयनराजेंचे अजित पवारांना आव्हान