Aadhaar Card | ग्राहकांना UIDAI चं ‘गिफ्ट’ ! आता ‘तात्काळ’ होतील ‘आधार’संबंधी ‘ही’ सर्व कामे, जाणून घ्या मोदी सरकारचा प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card | युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया देशभरात 166 स्टँडअलोन आधार एन्रॉलमेंट आणि अपडेट सेंटर उघडण्याच्या तयारीत आहे. UIDAI ने अधिकृत वक्तव्यात ही माहिती दिली. सध्या 166 पैकी 55 आधार सेवाकेंद्र (ASKs) कार्यरत आहेत. याशिवाय बँका, पोस्ट तसेच राज्य सरकारांद्वारे 52,000 आधार नामांकन केंद्रांचे संचालन केले जात आहे. (Aadhaar Card)

UIDAI ने जारी केले वक्तव्य
UIDAI ने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ही योजना 122 शहरांमध्ये 166 एकल आधार एन्रॉलमेंट आणि अपडेट सेंटर उघडण्याची (Aadhaar Card) आहे. आधार सेवाकेंद्र आठवड्याचे सातही दिवस उघडी ठेवली जातात. आधार केंद्रांनी दिव्यांग व्यक्तींसह 70 लाख लोकांची गरज पूर्ण केली आहे.

मॉडल ए च्या आधार सेवाकेंद्राची (Model-A ASKs) क्षमता प्रतिदिवस 1,000 नामांकन आणि अपडेट रिक्वेस्ट पूर्ण करण्याची आहे. तर, मॉडल बी केंद्र (Model-B ASKs) 500 आणि मॉडल सी (Model-C ASKs) ची 250 एन्रॉलमेंट आणि अपडेशनची रिक्वेस्ट पूर्ण करण्याची क्षमता असते. आतापर्यंत यूआयडीएआयने 130.9 कोटी लोकांना आधार नंबर दिला आहे. (Aadhaar Card)

खासगी आधार सेवाकेंद्र नाहीत
खासगी आधार सेवाकेंद्र उपलब्ध नाहीत. इंटरनेट कॅफे वाले आधारसंबंधी त्याच सेवा देतात,
ज्यांचा अधिकार यूआयडीएआयने सर्वसामान्यांना दिला आहे.
आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारख किंवा इतर माहिती सुधारित करणे, पीव्हीसी कार्ड प्रिंट करून मागणवणे,
सामान्य आधार कार्ड मागवणे इत्यादी सुविधा मिळतात.

Web Title :- Aadhaar Card | aadhaar latest news uidai will open 166 aadhaar seva kendras across the country know what works are done here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCB Raid | जहाजावर ‘रेव्ह पार्टी’ ! शाहरुख खानच्या मुलाची एनसीबीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय झालंय

NCB Raid | एनसीबीचा समुद्रातील क्रुजवर सुरू झालेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा; IPS अधिकारी ताब्यात?

Pune News | महात्माजींना स्मरून लोकशाही, संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात