Aadhaar Card केंद्र चालक जास्त पैसे मागत आहे का? जाणून घ्या कुठं अन् कशी करावी तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card | आधार जारी करणारी संस्था यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधारमध्ये विविध अपडेट करण्यासाठी शुल्क ठरवलेले आहे. तरीही अनेकदा आधार कार्ड (Aadhaar Card) केंद्र चालक लोकांकडून जास्त पैसे मागतात. अशावेळी आधार कार्डधारकाला समजत नाही की काय करावे?

यूआयडीएआयने अशाप्रकारची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आधारकार्डधारकांना तक्रार नोंदवण्याची सवलत दिली आहे. जर तुमच्याकडून कुणी आधार केंद्रावर आधार कार्डात अपडेशनसाठी ठरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त मागत असेल तर त्याची तक्रार करू शकता. असे झाल्यास तुम्ही 1947 आधार संपर्क केंद्रात तक्रार करू शकता. याशिवाय [email protected] वर सुद्धा तक्रार दाखल करू शकता.

लक्षात ठेवा आधार कार्ड बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी लागत नाही.
तर आधार कार्डमध्ये अपडेशनसाठी पैसे द्यावे लागतात.
बायोमेट्रिक्समध्ये बदल करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर जावे लागते.

Web Title : Aadhaar Card | addhar card center operator asking for more money know how you can complain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update