पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेसाठी आता ‘आधार’ अनिवार्य, अन्यथा ३ ऱ्या टप्पात मिळणार नाहीत ‘पैसे’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील ६ कोटी ३५ लाख शेतकऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात २-२ हजार रुपये मिळाले आहेत. आता १ ऑगस्ट पासून ३ रा टप्पा देण्यात येणार होता. मात्र अजूनही कृषि मंत्रालयाने स्पष्ट केले नाही की तिसऱ्या टप्पात शेतकऱ्यांना निधी कधी पर्यंत मिळणार आहे. परंतू आता ज्या शेतकऱ्यांनी पहिला आणि दुसरा टप्यात पैसे घेतले त्यांचे आधार व्हेरिफिकेशन झालेले नव्हते. आता हेच व्हेरिफिकेशनचे काम ३ ऱ्या टप्प्यात होणार आहे.

विशेष म्हणजे ज्या लोकांनी पैसे घेतले आहे परंतू जे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार आहे. सरकारचा प्रयत्न हा आहे की गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा.

आधार अनिवार्य
परंतू यामुळे आता सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आधार बायोमेट्रीक का करुन घेतले नाहीत. यावर कृषि मंत्रालयाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले की, योजनेच्या दुसऱ्या टप्प्यावेळी मंत्रिमंडळाने आधारला अनिवार्य केले आहे, परंतू त्यानंतर यातून दिलासा दिला होता.

या कारणाने दिला होता दिलासा
सरकारचा यामागे हा हेतू होता की आधारला त्याचवेळी अनिवार्य केले असेत तर दुसऱ्या टप्पात शेतकऱ्यांना मदत देण्यात उशीर झाला असता. यामुळे शेतकऱ्यामध्ये अंसतोष निर्माण झाला असता म्हणून आधारच्या निर्णयातून तातपुरता दिलासा देण्यात आला होता. ही अट आता तिसऱ्या टप्प्यात देण्यात येणाऱ्या निधीसाठी मान्य आहे. दुसऱ्या टप्पात फक्त आधारचा क्रमांक अनिवार्य करण्यात आला होता. परंतू आता ३ ऱ्या टप्पाचे पैसे देण्याआधी सरकार आधार क्रमांकाची तपासणी करुन योग्य ते पाऊल उचलेल.

पैसे परत मागवणार
अजून तरी यात अशी शक्यता नाही की एखाद्या आपात्र व्यक्तीला पैसे मिळाले असेल, परंतू एवढी मोठी योजना असल्याने ही शक्यता नाकारता येत नाही. जर अपात्र लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले असेल तर ते पैसे सरकारकडून परत मागवण्यात येतील. अशा लोकांना पैसे डीबीटीच्या द्वारे गेले आहेत. तेच आता डीबीटीच्या माध्यामातून परत घेतले जातील. ही बाब आम्ही राज्यापर्यंत पोहचवली आहे अशी माहिती योजनेचे सीईओ विवेक अग्रवाल यांनी दिली आहे.

राज्य शेतकरी सेवा पार्टलवर नोंदणी
या योजनेत आधी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात त्या शेतकऱ्यांची निवड केली होती ज्यांचे राज्याच्या शेतकरी सेवा पोर्टलवर पहिल्यापासूनच नोंदणी करण्यात आली होती. लेखापालांनी या शेतकऱ्यांचा यादीतील शेतकऱ्यांची नावे गावा-गावात जाऊन तपासण घेतली होती. त्यांचे नाव, मोबाइल नंबर, आधार कार्ड यांची तपासणी करुन या शेतकऱ्यांची यादी कृषि विभागाला दिली होती. व्हेरिफाय करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा डाटा पीएम किसान पोर्टलवर फिड करण्यात आला होता. त्यानंतर लाभार्थी म्हणून त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली. परंतू आता तिसऱ्या टप्प्यात आधार बायोमैट्रिकचे व्हेरिफिकेशन देखील होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –