UIDAI नं सांगितलं ‘आधार’कार्डला सुरक्षित ठेवण्याचा नवीन ‘उपाय’, तुमचे महत्वाचे डिटेल्स चोरीला जाणं ‘अशक्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधारकार्ड महत्वाच्या ओळखपत्रांविषयी एक आहे. सध्या कोणत्याही शासकीय कार्यालयात आधारकार्डचा वापर सक्तीचा झाला आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड क्रमांक जोडणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र आधारकार्डचा डेटा सुरक्षित राहील याची खात्री देता येत नाही. तुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होण्याची किंवा शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आधाराची सुरक्षितता वाढवण्यासाठी आधार कार्ड लॉक करण्याचा नवीन ऑप्शन आला आहे.

या स्टेप्स फॉलो करा आणि आधार कार्ड लॉक करा
– आधार कार्डची www.uidai.gov.in ही वेबसाइट ओपन करा.
– साइट ओपन केल्यावर आधार ऑनलाइन सर्व्हिसमध्ये तीन ऑप्शनवर दिसतील.
– यामध्ये सर्वात शेवटी तिसर्‍या क्रमांकावर लॉक / अनलॉक बायोमेट्रिक्सचा पर्याय असेल. त्यावर क्लिक करा.
– ऑप्शनवर क्लिक करताच एक नवीन लिंक उघडेल. त्यात आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करावा लागेल.
– ही माहिती भरल्यानंतर सेंड OTP वर क्लिक करा.
– OTP टाकताच आपले अकाउंट लॉगइन होईल.
– यांनतर डेटा लॉक करण्यासाठी पुन्हा सुरक्षा कोड टाकून Enable वर क्लिक करा.
– त्यावर क्लीक केल्यानंतर तुम्हाला ‘Congratulation! Your Biometrics Is Locked’ असा मॅसेज येईल.

SMS द्वारेही करता येणार आधार लॉक
– SMS द्वारेही ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा आधारचा डेटा लॉक आणि अनलॉक करता येतो. UIDAI च्या 1947 या क्रमांकावर SMS करा.
– SMS मध्ये ‘GETOTP’ लिहून एक स्पेस द्यावी आणि नंतर तुमच्या आधारचे शेवटचे 4 नंबर लिहून 1947 या क्रमांकावर SMS पाठवा.
– यानंतर UIDAI तुमचा आधार Lock केला जाईल आणि Lock झाल्याचा तुम्हाला मेसेज पाठवेल .
ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा आधार Unlock करताना हीच प्रोसेस फॉलो करावी लागेल.