‘आधार कार्ड’ हरवलं तर घाबरू नका, ‘असं’ मिळावा ‘नवीन’ कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक वेळा आपली कागदपत्रे हरवतात, कधी गहाळ होतात, तर कधी चोरी होतात. आज या सर्व कागद पत्रात सर्वात महत्वाचा दस्तावेज कोणता असेल तर तो आहे आधार कार्ड. जर आधार कार्ड हरवले तर ते कसे मिळणार असा प्रश्न पडतो. परंतू आधार हरवले तरी घाबरुन जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही नवे आधार अगदी सहज मिळवू शकतात. तेही घरच्या घरी.

मोबाइल नंबर आवश्यक
सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमचे आधार कार्ड चुकून हरवले तर तुमच्याकडे सर्वात आधी आवश्यक आहे ते म्हणजे तुमचा आधार कार्ड नोंदणीकृत फोन नंबर. याच फोन नंबरच्या आधारे तुम्ही तुमचे आधारकार्ड प्राप्त करु शकतात. जर तुम्ही दिलेला आधार कार्डसाठीचा मोबाइल नंबर बंद झाला असेल तर काय करणार? अशा वेळी तुम्ही तुमचे नवे आधारकार्ड काढू शकतात.

असे मिळवा आधार
सर्वात आधी यूआयडीएआयच्या वेबसाइटवर https://uidai.gov.in/hi/ वर जाऊन शकतात. या वेबसाइटवर गेल्यावर तुमच्या उजव्या बाजूला आधार मिळवण्याच्या विभागात आधारचे पुनर्मुद्रमचा पर्याय मिळेल. यावर तुमच्या आधार नंबर, सिक्युरेटी कोड टाका त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर टाका आणि OTP येईल तो टाका. यानंतर तुम्हाला ऑनलाइन शुल्क भरावे लागेल. हे शुक्ल तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआय पेमेंटच्या माध्यामातून भरु शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड डाकच्या माध्यमातून मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –