Aadhaar Card | पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार कार्ड बनवताना करावे लागणार नाही फिंगरप्रिंट आणि आय स्कॅन, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठ्यांप्रमाणेच आता मुलांसाठी सुद्धा आधार कार्ड (Aadhaar Card) तेवढेच महत्वाचे आहे. हे त्यांच्या शाळेच्या अ‍ॅडमिशनसह अनेक गोष्टीत उपयोगी येऊ शकते. जर मुल 5 वर्षापेक्षा छोटे असेल तर बायोमेट्रिक डाटा न देता आधार (Aadhaar Card) बनवू शकता. यास बाल आधार म्हणतात.

अशी आहे पूर्ण प्रोसेस
सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जा. येथे होम पेजवर ’Get AAdhaar’ मधून ’Book an appointment’ वर क्लिक करावे लागेल. पेज उघडल्यानंतर तुम्हाला राज्य, जिल्हा आणि आधार केंद्राची निवड करून appointment बुक करावी लागेल. यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाकून आणि ओटीपी नोंदवून appointment ची तारीख बुक करावी लागेल.

असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी आधार केंद्रात आपली आणि मुलाची कागदपत्र घेऊन जावे लागेल.
येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरवा लागेल.
या फॉर्ममध्ये तुम्हाला मुलाचे नाव, आई-वडीलांचा आधार नंबर आणि इतर माहिती द्यावी लागेल.
आता तुम्हाला मुलाचा जन्म दाखला आणि आई-वडीलांपैकी एकाचा आधार नंबर केंद्रामध्ये जाऊन द्यावा लागेल.
रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर 60 दिवसानंतर एक SMS येईल. एनरॉलमेंट प्रोसेस च्या 90 दिवसांच्या आत तुम्हाला बाल आधार पाठवले जाईल.

Web Titel :- aadhaar card for a child below 5 years of age you will not have to give this information

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | ई-कार भाडे तत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या चालकांचा विरोध

Crime News | नगर अर्बन बँक शाखा व्यवस्थापकाचा संशयास्पद मृत्यू, उलटसुलट चर्चा

Pune Corporation | पुणे पालिकेतील नगरसेवकांची ‘पोलखोल’, पालिकेच्या पैशांवर नगरसेवकांची सुरु असलेली ‘चमकोगिरी’ उजेडात