मुलांच्या ‘आधार’कार्डसाठी खूपच महत्वाची ‘ही’ कागदपत्रे, शाळेच्या प्रवेशावेळी देखील येणार कामाला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षातील पहिला महिना लवकरच संपणार आहे. काही महिन्यातच नवीन शाळेसाठी मुलांची प्रवेश प्रक्रिया देखील सुरु होणार आहे. आई वडिलांनी त्याबाबतची पळापळ देखील सुरु केली आहे. कारण त्यासाठी अनेक कागदपत्रांची देखील आवश्यकता पडणार आहे. ज्यामधील एक आधार कार्ड देखील आहे. यामुळेच सध्या UIDAI ने लहान मुलांचे आधार बनवता येईल असे एप्लिकेशन सुरु केले आहे.

5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी –
आधार कार्ड 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि लहान मुलांसाठी बनवता येऊ शकते. जर आपल्या मुलाचे वय 5 वर्षापेक्षा कमी असेल तर यासाठी त्याचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल. जर जन्म प्रमाणपत्र नसेल तर मुलाच्या पालकांपैकी एकाच्या आधार कार्डचा उपयोग करता येऊ शकतो. 5 वर्षाखालील मुलांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. परंतु, जेव्हा त्याचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असेल तेव्हा बायोमेट्रिक रेकॉर्ड अपडेट करावे लागेल.

5 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांसाठी –
जर मुलाचे वय पाच वर्षापेक्षा अधिक असेल तर यासाठी तुम्हाला शाळेचे लेटर हेड आणि गावचे सरपंच किंवा ग्रामपंचायत सभासदाचे लेटर देखील आवश्यक असेल. आधार कार्डसाठी अर्ज करण्याआधी खालील कागदपत्रे जमा करून घ्या. पाच वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांना बायोमेट्रीक रेकॉर्ड द्यावे लागते आणि पंधरा वर्षानंतर याला पुन्हा अपडेट करावे लागते.

मुलांच्या आधार कार्डसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा आधार सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता.

1. आधार एनरोलमेंट सेंटर किंवा आधार सेवा केंद्रावर जाऊन एनरोलमेंट फॉर्म भरावा लागेल.

2. मुलांचा ऍड्रेस प्रूफ नसेल तर मुलांच्या आई वडिलांचा आधार नंबर द्यावा लागेल.

3. सर्व गरजेच्या कागदपत्रांसह तुम्हाला हा फॉर्म देखील सबमिट करावा लागेल.

4. या फॉर्म ला जमा केल्यानंतर मुलाचे बायोमेट्रिक रिकॉर्ड बनवले जाईल. यामध्ये हाताच्या दहा बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि फोटो घेतले जातील.

5. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक एनरोलमेंट स्लिप दिली जाईल.

6. या स्लिपवर एनरोलमेंट आयडी नंबर आणि तारीख दिली जाईल.

7. या एनरोलमेंट आयडीच्या मदतीने तुम्ही आधार कार्डचा स्टेटस माहिती करून घेऊ शकता.

8. आधार एनरोलमेंटच्या 90 दिवसांमध्ये अर्जदाराला त्याच्या पत्त्यावर आधार कार्ड पाठवले जाते.