‘आधार’कार्ड धारकांना ‘पॅन’कार्ड मिळवणं झालं एकदम सोपं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड असेल, परंतु पॅन कार्ड नसेल तर अशा लोकांसाठी पॅन कार्ड बनविणे आता अत्यंत सोपे झाले आहे. अशा लोकांना पॅन कार्ड साठी आवेदन करताना कोणतेही इतर डॉक्युमेंट जमा करणे आवश्यक नाही. पॅनकार्डसाठी आवेदन करताना आयकर विभाग आपली सगळी माहिती ‘आधार’ कडूनच घेईल जी वैध मानली जाईल. यासाठी केवळ आधार क्रमांक मोबाईलवरील ओटीपीद्वारे प्रमाणित करावा लागेल. १ सप्टेंबरपासून प्राप्तिकर विभागाने या संदर्भातील नियमात बदल केला आहे.

तर पॅन कार्डसाठी अर्ज केल्याचे गृहीत असेल :
आयकर विभागाने असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल आणि त्याने आर्थिक व्यवहारामध्ये आधार क्रमांक दिला असेल तर त्याने पॅन कार्ड मिळविण्यासाठी अर्ज केला असेल असे गृहित धरले जाईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा आदेश १ सप्टेंबरपासून देशभरात लागू झाला आहे. पॅन कार्ड बनवताना आता लोकांना फक्त आधार क्रमांक द्यावा लागतो. याशिवाय इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही.

तथापि, अशा लोकांना त्यांचा आधार क्रमांक मोबाईलवरील ओटीपीद्वारे प्रमाणित करावा लागेल. यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले होते की, आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्डऐवजी लोकांना आधार कार्ड वापरता येईल. तथापि, ज्यांच्याकडे आधीपासूनच पॅनकार्ड आणि आधार कार्ड आहे, त्यांना त्यांचे पॅन कार्डच द्यावे लागेल.

पॅनकार्डसह आधार जोडणे आवश्यक आहे :
३१ ऑगस्ट ही प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख होतीच परंतु पॅनकार्डला आधारशी जोडण्याचीही अंतिम मुदत होती. आपण अद्याप आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसल्यास त्वरित तसे करा. प्राप्तिकर विभाग हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करीत आहे. जर आपण आपला पॅन ३१ ऑगस्टपर्यंत आधारशी जोडले नसेल तर ते अवैध ठरले आहे. भविष्यात आपल्याला पुन्हा आपले नवीन पॅन कार्ड घ्यावे लागू शकते.

असे करा आधार-पॅन लिंक :
– प्राप्तिकर विभागाची ई-फाईलिंग वेबसाइट (www.incometaxindiaefiling.gov.in) इंटरनेटवर उघडा.

– येथे डाव्या बाजूला लाल रंगाच्या link Adhaar वर क्लिक करा.

– जर आपले आयकर खाते तयार केले नसेल तर नोंदणी करा.

– क्लिक केल्यावर, पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक, पॅन क्रमांक आणि आधार नुसार नाव भरावे लागेल.

– नंतर प्रदान केलेला कॅप्चा कोड टाइप करा.

– माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

– यानंतर आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.

आरोग्यविषयक वृत्त –