तुमच्याकडे असलेले Aadhaar Card बनावट तर नाही ना ? काही क्षणात ‘या’ पध्दतीनं समजू शकतं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. ते ओळखपत्रासाठी वापरले जाऊ शकते. कर्मचारी ठेवताना, भाड्याने खोली देताना आणि घरकामगार ठेवताना आणि इतर ठिकाणी अनेक लोक आधार कार्डाची मागणी करतात. (Aadhaar Card)

 

पण, तुमच्याकडे असलेले आधार कार्ड बनावट आहे की ओरिजिनल हे तुम्हाला कसे कळेल ? हे शोधणे अगदी सोपे आहे. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही UIDAI वेबसाइटची मदत घेऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही आधार कार्ड क्रॉस व्हेरिफाय करू शकता.

 

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे व्हेरिफाय केले जाऊ शकते. प्रथम आपण ऑनलाइन पडताळणीबद्दल बोलूया. तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar वर जाऊन Aadhaar Card ऑनलाइन पडताळू शकता.

 

यामध्ये यूजरला फक्त आधार क्रमांक द्यावा लागेल. यानंतर, वेबसाइटवर तुम्हाला वय, लिंग, राज्य आणि आधार कार्डचे शेवटचे तीन अंक याबद्दल माहिती दिली जाईल.

 

ऑफलाइन असे होईल व्हेरिफिकेशन
आधार कार्ड ऑफलाइन देखील व्हेरिफाय केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला आधारवर असलेला QR कोड स्कॅन करावा लागेल.
यासाठी तुम्ही अ‍ॅप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून Aadhaar QR scanner अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

 

आधार कार्डवर असलेला QR code यूआयडीएआयद्वारे डिजिटली स्वाक्षरी केलेला आहे.
हे सिक्युअर आणि टॅम्पर प्रुफ आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही आधार कार्डची सहज पडताळणी करू शकता.

 

Web Title :- Aadhaar Card | how to find out aadhaar card shared is not fake

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा