Aadhaar Card | जर तुमच्याकडे असेल Aadhaar तर एका क्लिकवर मिळेल कर्ज, जाणून घ्या कसा आणि कुठे करायचा अर्ज?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Aadhaar Card | सध्या कर्ज घेणे पहिल्यापेक्षा सोपे (How to get a Personal Loan) झाले आहे. केवळ केवायसी कागदपत्र जमा करावी लागतात. तुम्ही आधार कार्ड (Aadhaar card) द्वारे सुद्धा घरबसल्या ऑनलाईन पर्सनल लोन (Personal Loan through Aadhaar) साठी अर्ज करू शकता.

जाणून घ्या कसे आधारवर मिळेल कर्ज?

आपल्या बँकेच्या वेबसाइटवर किंवा अ‍ॅपवर जा.

बँकेच्या वेबसाईटवर पर्सनल लोनचा पर्याय मिळेल.

बँक तुमची पात्रता तपासेल.

पात्रता चेक करण्यासाठी दिलेला फॉर्म योग्यप्रकारे भरा.

काही मिनिटात निकाल सांगितला जाईल.

पात्र असल्यास अर्ज करण्याचा पर्याय मिळेल. किती लोन मिळेल हे सुद्धा समजेल.

रोजगार, उत्पन्न इत्यादी माहिती द्यावी लागेल. यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून फोन येईल.

* फोनवर व्हेरिफिकेशन केल्यावर पुढील स्टेप येईल.

आता आधार कार्डची कॉपी मागितली जाईल.

आधार कार्डची पडताळणी होताच बँक लोन कन्फर्म करेल.

यानंतर काही वेळात प्रोसेसिंग फी कापून कर्जाची रक्कम खात्यात पाठवली जाईल.

जाणून घ्या नियम

कर्ज घेण्यासाठी तुमचे वय 23 वर्ष असावे. जवळपास सर्वच बँका आधार कार्डवर पर्सनल लोनची सुविधा देत आहेत. यासाठी तुमच्याकडे कोणतेही कोलॅटरल मागितले जात नाही. म्हणजे काहीही गहाण ठेवावे लागत नाही. तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असतील तर आणि क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर काही मिनिटात कर्ज मिळेल.

 

Web Title : Aadhaar Card | how to get a instant loan via aadhaar card check process details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sharad Pawar | ‘जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार टार्गेट करतंय’ – शरद पवार

Girish Mahajan | काय सांगता ! होय, माजी मंत्री गिरीश महाजनांनी चक्क सिनेमा निर्मात्याकडे केली ‘ही’ मागणी; म्हणाले – ‘अजितदादा, जयंत पाटील….’

Ananya Pandey | अनन्या पांडे लग्न करतेय? हातामध्ये हिरवा चुडा? सोशल मीडिया वरती फोटोज झपाट्याने व्हायरल.