Aadhaar Card | आता हिंदी अन् इंग्रजीचे झंझट नाही, आपल्या स्थानिक भाषेत काढा Aadhaar, जाणून घ्या ऑनलाइन पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) 13 भाषांमध्ये घेऊ शकता, UIDAI ने प्रादेशिक भाषांची ही सुविधा दिली आहे. या सुविधेचा लाभ आधारमध्ये भाषा बदलण्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन (Online, offline) आणि पोस्टाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आधार कार्डची भाषा बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत जाणून घेवूयात…

 

अशी आणि पूर्ण प्रकिया

अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा : https://uidai.gov.in/

अपडेट आधार सेक्शनमध्ये अपडेट डेमोग्राफिक डेटा ऑनलाइनवर क्लिक करा.

आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर दिसेल.

पोर्टल उघडल्यानंतर कॅप्चा सुरक्षा कोडसह 12 अंकाचा विशिष्ट अधार नंबर नोंदवा.

डिटेल पूर्ण केल्यानंतर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवण्यावर क्लिक करा.

आता रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर 6 अंकी ओटीपी मिळेल.

ओटीपी नोंदवा, आणि लॉगिन बटनावर क्लिक करा.

यानंतर, Update Demographics डेटा बटनवर क्लिक करा.

या पानात सर्व Demographics डेटा असेल. येथे आपल्या पसंतीची प्रादेशिक भाषा निवडा.

पॉपअपमध्ये लोकसंख्या अपडेट करण्यासाठी प्रक्रियेचे पालन करा आणि आपला अर्ज जमा करा.

तपासून घ्या की तुमचे नाव स्थानिक भाषेत योग्यप्रकारे दिले गेले आहे का.

जर तुम्हाला वाटत असेल की यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे तर एकदा तपासा आणि ते एडिट करा.

आपला पत्ता एडिट करा.

आता प्रीव्ह्यू बटनवर क्लिक करून पहा की देण्यात आलेली सर्व माहिती योग्य आहे किंवा नाही.

तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी जनरेट होईल.

कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी पुरावा म्हणून सबमिट करा आणि पडताळणीसाठी जमा करा.

एकदा पत्ता बदलल्यानंतर, स्थानिक भाषा आपोआप बदलली जाईल.

या सर्व प्रक्रियेनंतर तुम्ही तुमचे नवीन आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

अपडेट करण्याच्या प्रकियेत 1-3 आठवडे लागू शकतात.

तुम्ही आधार सेवा केंद्रात जाऊन किंवा पोस्टाच्या माध्यमातून आपली आधार भाषा ऑफलाइन सुद्धा बदलू शकता.

Web Titel :- aadhaar card | how to update correct local language in aadhaar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल