Aadhaar Card | आधार कार्ड गहाळ झाल्यास ‘या’ क्रमांकावरुन मिळवा नवीन आधार; जाणून घ्या महत्वाची प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड हे भारतीय नागरीकांचे महत्वाचे दस्तऐवज (Documents) आहे. अनेक खासगी आणि सरकारी कामासाठी आधार कार्डची (Aadhaar Card) आवश्यकता असते. त्याचबरोबर कोणत्याही योजना आणि सवलती मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड (Aadhaar Card) गरजेचं असतं. दरम्यान एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड हरवल्यास अनेक कामात अडचण निर्माण होते. नवीन कार्ड मिळवण्यासाठीही कार्यालयात चकरा माराव्या लागतात. परंतु नवीन आधार कार्ड बनवताना एक महत्वाचा क्रमांक जर तुमच्याजवळ असेल तर घरबसल्या नवीन आधार कार्ड मिळवू शकता. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

हरवलेले कार्ड पुन्हा नवीन मिळवण्यासाठी तुमच्याकडे नवीन आधार कार्ड काढतेवेळीचा महत्वाचा नंबर जवळ असणे आवश्यक आहे. हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UID) अथवा एनरोलमेंट आयडी (EID) आहे. तो 28 अंकी असतो. जो आधारसाठी नोंदणी करता तेव्हा तुम्हाला मिळतो. आधार नोंदणी केल्यानंतर, तुमचा आधार UID/EID जपून ठेवणे आवश्यक आहे. याच माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार नोंदणीबाबत माहिती चेक करू शकणार आहे. UIDAI नुसार, आधार हरवल्यास नवीन कार्डसाठी आधार UID/EID च्या माध्यमातून ऑनलाइन अर्जही करू शकताय.

UID/EID च्या माध्यमातून आधार कार्ड कसे मिळवाल?
आधार कार्डधारकाला त्याच्या आधार कार्डचा (Aadhar Card) नंबर लक्षात नसेल तर त्यावेळी EID कामी येतो.
या नंबरच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा नव्याने आधार कार्ड मिळवु शकता.
EID चा वापर आधार स्टेटस तपासण्यासाठी आणि आधार डाउनलोड करण्यासाठीही केला जातोय.
तसेच तुम्ही UIDAI वेबसाइटवरून पुन्हा आधार डाउनलोड (Download) करू शकता.
त्याचबरोबर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आधार वेबसाइटवर जावे लागणार आहे.
आणि त्याठिकाणी 14 अंकी नोंदणी नंबर द्यावा लागणार आहे. त्यावेळी तुमचे आधार कार्ड डाउनलोड होऊ शकतं.

 

Web Title :- Aadhaar Card | keep uid or enrollment number secure to make new aadhar card read details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sudhir Mungantiwar | ‘महाविकास आघाडी सरकार बाराही महिने झोपतं, यांना पाहून कुंभकर्णही म्हणेल, ‘रिश्ते में ये हमारा बाप लगता है’ – सुधीर मुनगंटीवार

Pune Crime | महिंद्रा लाइफस्पेस कंपनीकडून ब्लास्टिंग, परिसरातील घरांना तडे; नागरिकांची न्यायालयात धाव

Pune Crime | ‘मोक्का’मधील फरारी अक्षय खवळेला शिवणे परिसरातून अटक; पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई